एक्स्प्लोर

पुणे पोर्शे केसमध्ये ब्लड सॅम्पल अफरातफरी करणारा मास्टरमाईंड कोण? पुणे पोलिस त्याला कसं शोधणार?

Pune Car Accident : पुणे पोर्शे केसमध्ये ब्लड सॅम्पल अफरातफरी करणारा मास्टरमाईंड कोण आहे आणि पुणे पोलिस त्याला कसं शोधणार हे जाणून घ्या.

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने येणाऱ्या पोर्शे कारने दोघांना चिरडलं. या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु असून दिवसेंदिवस नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता पोलिस या प्रकरणातील ब्लड सॅम्पलची अफरातफरी करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत. या प्रकरणात रक्ताचे नमुने नेमके कुणी आणि कुणाच्या सांगण्यावरून बदलले, याचा पोलिस शोध घेत आहेत. पुणे पोर्शे कार प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. सोमवारी पार पडलेल्या या सुनावणीत न्यायालयाने विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार याना 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्लड सॅम्पल अफरातफरी करणारा मास्टरमाईंड कोण?

रक्ताचे सॅम्पल फेरफार प्रकरणात मास्टर माईंड कोण याचा तपास आता पोलिस करत आहेत. यासाठी मोबाईल,सीसीटीव्ही या तांत्रिक बाबींचं विश्लेषण करण्यासाठी तपास महत्वाचं असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून न्यायालयासमोर करण्यात आला. याप्रकरणात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. 

ब्लक सॅम्पलमध्ये फेरफार कुणाच्या सांगण्यावरून?

रक्ताचे सॅम्पल फेरफार करणारा अश्फाक मकानदार याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्फाक मकानदारला ब्लड सॅम्पल बदलण्यास कुणी सांगितलं? अश्फाक मकानदारने ब्लक सॅम्पलमध्ये फेरफार केली, मात्र त्याने हे कोणाच्या सांगण्यावरुन केलं. तो विशाल अग्रवालपर्यंत कसा पोहचला? या बाबींचा पोलिस शोध घेत आहेत.

पुणे पोलिस त्याला कसं शोधणार?

अश्फाकने कुणाच्या सांगण्यावरून हे केलं? अग्रवाल दाम्पत्याशी त्याची ओळख होती का? किंवा त्याला अशा कोणत्या व्यक्तीने अग्रवाल कुटुंबियांना मदत करायला सांगितली आणि मध्यरात्री अश्फाक मदतीला धावून गेला, याचा पोलिस शोध घेणार आहेत. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची चेन चेक करणार आहे. कोणाशी कोणी कसा संपर्क केला याची चौकशी करुन मास्टरमाईंडपर्यंत पोहचणार

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Car Accident : न्यायालयासमोर हात जोडून उभे होते विशाल आणि शिवानी अग्रवाल, कोर्टाने 14 जूनपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Kunal Kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई, दोन नेत्यांना चौकशीलाही बोलावलं
कुणाल कामराचा शो झालेला स्टुडिओ फोडणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई, पोलिसांनी 'त्या' दोन नेत्यांना चौकशीला बोलावलं
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरABP Majha Headlines : 7AM Headlines 24 March 2024ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 24 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis : खुर्ची सलामत, तो कोट पचास; फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Kunal Kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई, दोन नेत्यांना चौकशीलाही बोलावलं
कुणाल कामराचा शो झालेला स्टुडिओ फोडणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई, पोलिसांनी 'त्या' दोन नेत्यांना चौकशीला बोलावलं
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget