एक्स्प्लोर

Pune Porsche Accident : राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, गृहमंत्र्यांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडमध्ये

Pune News: पुण्यात धनिकपुत्राच्या पोर्शे कारने दोघांना चिरडले. नागरिक संतापले. पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई. टीकेची प्रचंड झोड उठल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

पुणे: पुण्यात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. वेदांत चालवत असलेली पोर्शे कार तब्बल 200 KMPH च्या वेगाने एका बाईकला धडकली होती. यामध्ये बाईकवर बसलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याच्यावर कारवाई करण्यात चालढकल केली होती. त्यामुळे वेदांत अग्रवाल अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला होता. वेदांत अग्रवाल हा पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप झाला होता. या सगळ्यामुळे सामान्य जनता संतापली होती. (Pune Crime News)

जनतेच्या रोषामुळे टीकेची प्रचंड झोड उठल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचेही कठोर आदेश

राज्याच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच पुणे अपघातप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत फडणवीसांनी दिले होते. पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत आहे.   या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 

पोलिसांकडून कारवाईचा धडाका

पुणे पोलिसांनी सुरुवातीच्या काही तासांमध्ये या प्रकरणात अपेक्षित कामगिरी केली नसली तरी मंगळवारी पहाटेपासून पोलिसांनी वेगवान कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून उद्योजक विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले. तसेच वेदांत अग्रवाल याने ज्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले होते आणि तो ज्या पबमध्ये गेला होता, तेथील मालक, मॅनेजर आणि बार टेंडरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना आता न्यायालयात हजर केले जाईल.

आणखी वाचा

पुणे पोलिसांच्या कारवाईची गाडी टॉप गिअरमध्ये, एक-एक करुन सर्वांनाच उचललं, मुलाच्या वडिलांपासून पब-बारचा मालक सगळेच जेलमध्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 30 March 2025MNS Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा, शिवाजी पार्कवर राजगर्जनाPM Narendra Modi Speech Nagpur : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वट- मोदीABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
कर्नाटकात नक्षलींचा बिमोड करणाऱ्या डॅशिंग 'कोल्हापूरकर' आयपीएस हेमंत निबाळकरांना मुख्यमंत्री पदक
Uk Visa Fee Hike : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये सुद्धा जाणं आणि तिथं राहणं महाग झालं! जाणून घ्या तुमच्या व्हिसाची किंमत किती वाढणार?
Trimbakeshwar Temple : आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
आता शिर्डीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर मंदिरात मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात
PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Beed Crime : बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
Embed widget