एक्स्प्लोर

Supriya Sule: अजित पवारांची साथ सोडून अनेक नेते शरद पवारांसोबत; 'विरोधक देखील शरद पवारांकडे अपेक्षेने...', सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule: अजित पवार यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काल (मंगळवारी) सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले.

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काल (मंगळवारी) सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का मानला जात आहे. तर काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार (Sharad Pawar) गटात पक्षप्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, पक्षात अनेक अनूभव प्रत्येकाला येत असतात. गेली अनेक वर्ष विकास आणि वैचारीक बैठक यांच्यात कधीच गल्लत केली नाही. 

विकासासाठी गेली ६० वर्षे शरद पवार (Sharad Pawar) हे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कार्यरत आहेत. काही विरोधक पवार यांच्याकडे आशेने पाहत आहे
शरद पवारांच्या नेतृत्त्वावर आमचा विश्वास आहेच, पण, काही विरोधक देखील शरद पवारांकडे अपेक्षेने पाहतात. यामध्येच सर्व काही आहे. पक्षात अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात,असंही पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष आणि भोसरीतील माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला. त्यांच्यासोबतच, नेहरूनगर येथील माजी नगरसेवक आणि पक्षाचे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, ताथवडे येथील माजी नगरसेवक आणि पक्षाचे भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष आणि चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते यश साने यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा काल (मंगळवारी) दिला आले. ते सर्व अजित पवारांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या या निर्णयाने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 

काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

अजित गव्हाणे यांच्यासह काही माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पंवार यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. या नेत्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची साथ सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचा पक्षप्रवेश ते शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याते निश्चित झाल्याचे मानले जात होते. आज(बुधवारी) ते सर्व नेते शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले नेते परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरू आहे.  

आज शरद पवारांची तुतारी फुंकणाऱ्यांची नावं

अजित गव्हाणे- शहराध्यक्ष
राहुल जाधव - कार्याध्यक्ष
हनुमंत भोसले - माजी महापौर
वैशाली घोडेकर - माजी महापौर
समीर मासुळकर - माजी नगरसेवक
पंकज भालेकर - माजी नगरसेवक
समीर वाबळे - माजी नगरसेवक
गीता मंचरकर - माजी नगरसेवक
वैशाली उबाळे - माजी नगरसेवक
शुभांगी बोऱ्हाडे - माजी नगरसेवक
विनया तापकीर - माजी नगरसेवक
संगीता ताम्हाणे - माजी नगरसेवक
रवींद्र सोनवणे - (पती, माजी नगरसेविका दिवंगत पौर्णिमा सोनवणे)
यश साने - पुत्र, दिवंगत नगरसेवक दत्ता साने
वसंत बोऱ्हाटे - माजी नगरसेवक
संजय नेवाळे - माजी नगरसेवक
प्रवीण भालेकर - माजी नगरसेवक
निवृत्ती शिंदे - माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ

संबधित बातम्या: Ajit Pawar vs Sharad Pawar : शरद पवारांची अजितदादांना पुन्हा धोबीपछाड, दादांच्या बालेकिल्ल्यातील शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 20 जुलैला तुतारी फुंकणार

Sharad Pawar : अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; शरद पवार गटात 'या' बड्या नेत्यांचा आज होणार पक्षप्रवेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Mahadev Munde :आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपीGanga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?Beed Madhav Jadhav : निवडणूक काळात माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखलCity 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
Embed widget