एक्स्प्लोर

Ajit Pawar vs Sharad Pawar : शरद पवारांची अजितदादांना पुन्हा धोबीपछाड, दादांच्या बालेकिल्ल्यातील शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 20 जुलैला तुतारी फुंकणार

Ajit Pawar vs Sharad Pawar, Pimpri Chinchwad : उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) मोठा धक्का बसलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर आणि युवक अध्यक्ष यश सानेंनी राजीनामे दिले आहेत.

Ajit Pawar vs Sharad Pawar, Pimpri Chinchwad : उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) मोठा धक्का बसलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर आणि युवक अध्यक्ष यश सानेंनी राजीनामे दिले आहेत. प्रदेश कार्यालयात हे राजीनामे सोपविल्याची माहिती गव्हाणेंनी दिली आहे. या चौघांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीची (NCP Sharad Pawar)तुतारी फुंकणार आहेत. येत्या 20 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) शरद पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. मात्र माजी आमदार विलास लांडेंच्या प्रवेशाबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी आयरामांची गर्दी 

अजित गव्हाणे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित गव्हाणे अजित पवारांची साथ सोडतील, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान, आता अजित गव्हाणे अजित पवारांची साथ सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांनी प्रवेश केला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी तुतारी हाती घेतली होती. 

विलास लांडेंच्या प्रवेशाबाबत अजूनही अनिश्चितता 

अजित गव्हाणे यांच्यासोबतच माजी आमदार विलास लांडे यांनीही काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. तेही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, विलास लांडेंच्या प्रवेशाबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.  विलास लांडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर अजित पवारांना मोठा हादरा बसल्याची शक्यता आहे. कारण विलास लांडे यांनी साथ सोडली तर अजित पवारांचे शहरातील वर्चस्व कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. 

सूर्यकांता पाटील यांनाही केला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी 10 वर्षांनंतर शरद पवारांच्या पक्षात घरवापसी केली. 25 जून रोजी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारासोबत पक्षाचे काम केले होते. 10 वर्षांपूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या.  मात्र, 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

Prakash Ambedkar on Ajit Pawar : अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं, आम्ही त्यांना पुन्हा राजकारणातील 'दादा' करु, प्रकाश आंबेडकरांची ऑफर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget