Pune Political News :'मावळ लोकसभा मतदारसंघातून मीच निवडणूक लढवणार,' शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा
2024 ची मावळ लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे लढवणार की अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार लढणार? याबाबत चर्चा मतदारसंघात रंगली आहे. त्यात बारणेंनी जागेवर दावा केला आहे.

Pune Political News : महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (Pune Political News) सहभागी झाली. त्यानंतर 2024 ची मावळ लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे लढवणार की उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार लढणार? याबाबत चर्चा मतदारसंघात रंगली आहे. 2019साली पार्थ पवारांना ज्यांच्यामुळं पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्या श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादी आमच्या महायुतीत असली तरी 2024 लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार असणार,असं म्हणत आत्ताच दावा ठोकला आहे. त्यामुळं पार्थ पवारांचं काय होणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, राज्यात जी राजकीय परिस्थीती निर्माण झालेली मराहाष्ट्राने पाहिली आहे. येत्या काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळे मिळून जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल. स्थानिक पातळीवर काम करताना मोठा संघर्ष असतो. तो संघर्ष नाकारुन चालत नाही. मात्र हा युतीचा निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला आहे. त्यानुसार सगळे निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत पुढे जावं लागणार आहे.
Pune Political News : पार्थ पवारांना संधी दिली तर...
अजित पावारांच्या बंडानंतर आता पार्थ पवार राजकारणार सक्रिय झाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना श्रीरंग बारणे यांनी महायुतीचा उमेदवार मीच असल्याचा दावा केला आहे. महायुतीतले सगळ्याच पक्षांना एकत्र निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. मात्र काहीही झालं तरीही मीच उमेदवार राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Pune Political News : स्थानिक पातळीवर तिढा निर्माण होणार
राज्यातील बदलेल्या परिस्थितीनंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठीशी आहेत. आता या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. भाजपकडे असणाऱ्या चिंचवड विधानसभेवर नाना काटे यांनी दावा ठोकला आहे तर पिंपरी पालिका पुन्हा राष्ट्रवादी काबीज करेल, असं ते ठामपणे सांगत आहेत. दुसरीकडे पार्थ पवारांनी लढविलेल्या मावळ लोकसभेवर आधीच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं स्थानिक पातळीवर जुळवून घेताना तिन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आणि तिढा निर्माण होणार हे स्पष्ट आहे.
हेही वाचा -
Union Cabinet: केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मंत्र्यांना नारळ देऊन संघटनेसाठी जुंपणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
