एक्स्प्लोर

Pune VIDEO : विसर्जन संपल्याचं जाहीर करुन 5 वाजताच पुणे पोलिस डॉल्बीवर थिरकले, पण जवानांनी घाट सोडला नाही, पुढे तीन तास विसर्जन सुरूच

Pune Ganeshotsav 2025 : पुणे पोलिसांनी विसर्जन संपल्याचं जाहीर केलं, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घाट सोडला नाही. पुढे तीन तास विसर्जन सुरूच राहिलं.

पुणे : पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनावरून यंदा प्रशासनाचा आणि पोलिसांचा गोंधळ समोर आला आहे. एकीकडे पोलिसांनी संध्याकाळी पाच वाजताच मिरवणूक पार पडल्याचं जाहीर केलं आणि आनंद व्यक्त करण्यासाठी डीजेवर ठेका देखील धरला. दुसरीकडे मात्र अग्निशमन दलाचे जवान शेवटच्या गणपतीला निरोप देण्याची वाट बघत होते. शेवटी रात्री आठ वाजून सात मिनिटांनी शेवटच्या गणपतीचे विसर्जन झालं. त्यामुळे पुणे पोलिसांनी ही मिरवणूक गुंडाळल्याचं स्पष्ट झालं.

पुण्यात तब्बल 36 तासानंतर गणपती विसर्जन मिरवणुका पार पडल्या. गेल्या वर्षीचा 30 तासांचा विक्रम यावर्षी मोडीत निघाला. त्यामुळे कमी वेळेत मिरवणूक पार पाडण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न पुन्हा निकामी ठरलेत का? तसंच पोलिसांचं सुक्ष्म नियोजनही फसलं का? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.

पोलिसांचा सुक्ष्म नियोजन केल्याचा दावा फोल

पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचे नियोजनावरून पुणे पोलिसांवर बरीच चर्चा झाली, वाद रंगले. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सूक्ष्म नियोजन केल्याचा दावा केला. मात्र पुण्यातील यावर्षीची विसर्जन मिरवणूक यंदा 36 तास चालल्याचं स्पष्ट झालं.

मिरवणूक संपल्याचं तीन तास आधीच जाहीर

अनेक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन बाकी असतानाच विसर्जन मिरवणूक संपल्याची घोषणा पुणे पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिसांनी आनंद व्यक्त करत डॉल्बीवर ठेकाही धरला. मात्र यानंतर देखील अनेक मंडळाचे गणेश विसर्जन झालं.

अग्निशमन दलाचे जवानांनी घाट सोडला नाही

पुण्यातील विसर्जन मिरवणूक संपल्याचा दावा केला आणि सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचे जवान शेवटच्या गणपतीला निरोप देण्याची वाट बघत होते. कारण दरवर्षी सगळं विसर्जन झालं असं पोलिसांनी जाहीर केल्यानंतर कोणतेही मंडळ विसर्जनासाठी येत नाही. मात्र यावर्षी पोलिसांची प्रेस झाल्यानंतरही काही मंडळ विसर्जनासाठी येत होते.

पोलिसांनी असं का केलं?

महत्वाचं म्हणजे शेवटचे गणपती मंडळ अमरज्योत हे मंडळ आल्यांनतर मिरवणूक संपते. ते मंडळ दाखल व्हायच्या आधी मिरवणूक संपली असं जाहीर झालं. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घाट सोडला नाही. शेवट अमरज्योत तरुण गणपती मंडळाच्या बाप्पाच विसर्जन झालं आणि पुण्यातल्या शेवटच्या बाप्पाला निरोप दिला केला. पोलिसांनी या वेळी आधीच अस का केलं? असा प्रश्न या जवानानही पडला.

सायंकाळी पाच वाजता पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणूक संपल्याचं जाहीर केलं. त्यानंतर रात्री आठ वाजून सात मिनिटांनी पुण्यातला शेवटचा, म्हणजेच अमरज्योत तरुण मंडळ या गणपती मंडळाचं विसर्जन झालं. त्यामुळे पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणूक गुंडाळली हे यातून स्पष्ट झाले.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Pune Traffic Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
Pune MPSC Student Death : स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रथमेशनं संपवलं जीवन; शेवटची चिट्ठी नाही तर सापडल्या फक्त उसने पैसे घेतल्याच्या नोंदी
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रथमेशनं संपवलं जीवन; शेवटची चिट्ठी नाही तर सापडल्या फक्त उसने पैसे घेतल्याच्या नोंदी
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
मैत्रीणीशी बोलल्याचा राग अन् संशय आला, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणाचं अपहरण करून नेलं; 112 वर कॉल लावला अन् अवघ्या 53 मिनिटांत सुटका, तरुणाने सांगितला थरारक अनुभव
Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
लग्नासाठी 1 लाख द्या, सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी पोर्टल सुरू करा; लग्नाळू युवकाचं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेचं कंत्राट गैरहिंदूंना नको; भाजपा नगरसेवकाची मागणी, महापालिका आयुक्तांना पत्र
Pune Traffic Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये एकनाथ शिंदेचं फाडफाड इंग्रजी; लाडकी बहीण, आई-पत्नीचा उल्लेख, शिवरायांचा जयघोष
Devendra Fadnavis Ganesh Idol: डोक्यावर लाल फेटा, गळ्यात कंठा..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पंकजा मुंडेंनी स्वहस्ते घडवला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा'
डोक्यावर लाल फेटा, गळ्यात कंठा..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पंकजा मुंडेंनी स्वहस्ते घडवला ‘पर्यावरणपूरक गणपती बाप्पा', गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, थेट शब्द देऊन टाकला!
Embed widget