एक्स्प्लोर

Pranjal Khewalkar : 'ऐसा माल चाहिए' मुलीचे व्हिडीओ पाठवत प्रांजल खेवलकरांचा मेसेज, आक्षेपार्ह चॅटही सापडले

Pune Drugs Party : पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी राोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.

पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत 'ऐसा माल चाहिए' असा मेसेज केल्याचं समोर आलं आहे. तर प्रांजल खेवलकरांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं असून ज्या दोन महिलांना न्यायालयीन कोठडी दिली आहे त्यांना या कामाबद्दल बक्षीस दिल्याचा आरोप केला.

आरोपींना न्यायालयीन कोठडी 

पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणी रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत इतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पाच आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती कोठडी संपल्याने या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यामध्ये आता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवले

प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत 'ऐसा माल चाहिए' असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

ड्रग्ज प्रकरणाची इनसाईड स्टोरी

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यात ड्रग्ज पार्टीत अटक झाली. आता या प्रकरणाची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले. या दोघांचीही पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे .

श्रीपाद यादववर या आधी बेटींग प्रकरणात गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक देखील झाली आहे. तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटींगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो.

या दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले. शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले. यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरुन दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समधे अंमली पदार्थ सापडले.

खेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न, रोहिणी खडसेंचा आरोप

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरेही उपस्थित होते. ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. रक्ताच्या चाचणीचे अहवाल लवकरात लवकर मिळावे अशी मागणी त्यांनी कलीय. पार्टीत उपस्थित मुलींशी खेवलकर यांचा काहीही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं.

प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती आणि फोटो खडसेंच्या विरोधी आमदाराकडे गेल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. त्यासाठी रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकरांचे वकील पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन चौकशीची मागणी करणारे पत्रही दिले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीवर क्राईम ब्रँचची रेड, तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीवर क्राईम ब्रँचची रेड, तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
Jaykumar Gore on Supriya Sule: पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
पुण्यात कितीचा घोडेबाजार झाला? सुप्रिया सुळेंच्या आरोपावर जयकुमार गोरेंचा जोरदार पलटवार; म्हणाले...
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget