एक्स्प्लोर

Pune News: भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मोठा निर्णय, पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद, 30 सप्टेंबरपर्यंत नो-एन्ट्री

Pune News: पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पुण्यातील धबधबे आणि पर्यटनस्थळांवर जाण्याचा प्लॅन असलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

पुणे: गेल्या दोन दिवसांत लोणावळ्यातील भुशी डॅम आणि ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे (Waterfalls in Pune) पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. लोणावळा (Lonavala) आणि ताम्हिणीमधील घटनेनंतर प्रशासनाने ही पावली उचलली आहेत. पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भीमाशंकर अभयारण्यातील सर्व निसर्गवाटासुद्धा 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे विकेंडला पावसाची मजा लुटण्यासाठी पुणे परिसरातील धबधबे आणि पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. विकेंडच्या दिवसांमुळे पुणे जिल्ह्यातील धबधबे आणि पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी असते. मात्र, या निर्णयामुळे या सर्वांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

पुण्यातील कोणकोणती पर्यटनस्थळं राहणार बंद?

* भीमाशंकर येथील धबधबे पर्यटकांसाठी बंद

* कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद

* घोंगळ घाट नाला, खांडस ते भीमाशंकर मार्ग प्रवासासाठी बंद

* शिडी घाट पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद

* चोंडीचा धबधबा बंद

लोणावळ्यात पर्यटकांना संध्याकाळी 6 वाजेनंतर संचारबंदी

लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेले होते. याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले होते. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे, असा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिला.

आणखी वाचा

फक्त पंधरा मिनिटांच्या पावसानं प्रवाह वाढतो, पाण्याचा अंदाज नसेल आला...; भुशी डॅम परिसरात बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितलं काय घडलं?

भुशी डॅमनंतर ताम्हिणी घाटातही तेच घडलं, धबधब्यात उडी मारणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूने जीव गमावला, भोसरीच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणारSanjay Raut On Narendra Modi : पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे,  भोंदुगिरी करतात- राऊतSunil Kedar Case Update : शिक्षेला स्थगिती देण्याची सुनील केदारांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलीABP Majha Headlines : 10 AM : 04 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
Hindi OTT Web Series : हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
हिंदी वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्रींची हवा, एकाच वेळी दोघींचे ओटीटीवर पदार्पण
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 
Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
Embed widget