Pune Traffic Updates: पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाहतूकीत बदल, नेमकं काय कारण? पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Updates: शहर पोलीस दलाच्या वतीने तरंग हा अजय अतुल संगीत रजनीचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे.

Pune Traffic Updates: पुणे शहर पोलीस दलाच्या तरंग '2025' कार्यक्रमामुळे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाहतूकीत बदल (Pune Traffic Updates) करण्यात आला येणार आहे. शहर पोलीस दलाच्यावतीने तरंग हा अजय-अतुल संगीत रजनीचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आज सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतूकीत आज बदल करण्यात आला आहे. व्हीआयपी आणि त्यांच्या वाहनांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी वीर चाफेकर चौक व सिमला कार्यालयाजवळ तात्पुरते वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. (Pune Traffic Updates)
वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या आदेशानुसार हे बदल 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 ते मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. डीसीपी झेंडे यांनी सर्वांनी सहकार्य करावे आणि तात्पुरत्या वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. (Pune Traffic Updates)
मॉडर्न चौक ते डेक्कन वाहतूक विभागपर्यंत (100 मीटर) हा मार्ग तात्पुरत्या स्वरुपात दुहेरी वाहतूक (Pune Traffic Updates) करण्यात येत आहे. तर वसंतराव देशमुख पथ (घोले रोडने येणारी वाहतूक) बंद करण्यात येत आहे. तसेच जे एम रोडवरुन सुरभी लेनकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
मॉडर्न चौक -झाशी राणी पुतळा चौक - घोले रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. नागरिकांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वाहतूक कर्मचारी/ स्वयंसेवक यांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त यांनी केले आहे.





















