(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smriti Irani : दो धागे, श्रीराम के लिए उपक्रमाचा शुभारंभ होता, स्मृती ईराणी आल्या, त्यांनी पाहिलं अन् निघून गेल्या; पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यात "दो धागे-श्रीराम के लिए" या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रम सोडून निघून गेल्या आहेत. कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं कार्यक्रम मधेच सोडून जाणं पसंत केलं
पुणे : पुण्यात "दो धागे-श्रीराम के लिए" या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रम सोडून निघून गेल्या आहेत. कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं त्या मंचावर गेल्याचं नाहीत, उलट त्यांनी कार्यक्रम मधेच सोडून जाणं पसंत केलं. पुण्यातील मॉडेल महाविद्यालयाच्या मैदानावर हा शुभारंभ सोहळा पार पडला.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कार्यक्रम स्थळी थांबून आहेत. तत्पूर्वी स्मृती इराणी यांनी एफसी रोड वर "दो धागे, श्रीराम के लिए" या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानावर पुणेकरांना स्मृती इराणी संबोधित करणार होत्या. मात्र अत्यल्प उपस्थिती आणि रिकाम्या खुर्च्या पाहून इराणी मंचावर गेल्याचं नाहीत. उलट त्यांनी हा कार्यक्रम मध्येच सोडून जाणं पसंत केलं.
आयोजकांचं स्पष्टीकरण
त्यांच्या हा नियोजित दौरा असल्याचं दो धागे-श्रीराम के लिए कार्यक्रमाच्या आयोजिका अनघा घैसास यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, त्यांनी मला सकाळीच सांगितलं होतं, मुंबईत त्यांना नियोजित दोन कार्यक्रम होते, याची कल्पना आधीच दिली होती. गर्दी नव्हती म्हणून त्या गेल्या असं म्हणणं चुकीचं आहे. पुणेकर आत्ता दो धागे विणण्यासाठी एफसी रोडच्या सौदामिनी हँडलूम इथं गर्दी करून आहेत. मला ही तिकडं कधी पोहचेल असं झालंय. कदाचित आम्ही हा कार्यक्रम नंतर आयोजित केला असता तर इथं ही खुर्च्या कमी पडल्या असत्या, असा दावा त्यांनी केला आणि सोबकत आपण सगळेच राम भक्त आहोत. यासाठी प्रत्येकाला सेवा करता यावी, या हेतूने आपण "दो धागे, श्रीराम के लिए" हा उपक्रम राबविण्यात आल्या. कोणी ही इथं येऊन, प्रभू रामांची सेवा करू शकतो. लाखो हातांनी विणले जाणारे वस्त्र 22 जानेवारीला प्रभू श्रीरामांना परिधान केले जातील, असंही त्या म्हणाल्या.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
22 जानेवारीला प्रभू रामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अनघा घैसास यांच्या वीण कामांची ख्याती आहे. त्यामुळं प्रभू रामांचे वस्त्र इथून विणूयात असा निश्चय झाला. त्यानुसार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि आम्ही दोन धागे, प्रभू राम के लिए उपक्रमात सहभाग घेतला आहे, असं मंञी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune News : पुणे टू गुजरात थेट सायकलने गाठणार; पुण्यातील जल्लोषात सायकल रॅलरीला सुरुवात