(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune-Mumbai Expressway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवार-रविवार दोन तासांचा ब्लॉक; वेळ पाहून प्रवास करा!
शनिवार आणि रविवार पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपण पाहिलं आहे. त्यातच आता पुणे मुंबई एक्स्प्रेस-वे दोन दिवस काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे : शनिवार आणि रविवार पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर (mumbai pune express highway)प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आपण पाहिलं आहे. त्यातच आता पुणे मुंबई एक्स्प्रेस-वे दोन दिवस काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हीजर एक्स्प्रेस-वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या रस्त्यावर ग्रॅंटी बसवण्याचं काम करणार असल्याने या रस्त्यावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पुणे वाहिनीवर 18 मे रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने शेडूंग, खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 येथून पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. तसेच 19 मे रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करुन द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने कुसगाव पथकर स्थानकावरुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.
या अनुषंगाने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे, या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी98224982224 किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
ITMS - इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळं होणारा फायदा
- वाहनं टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
- यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील.
- ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
- सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
- अशावेळी द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
- अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याची ही कल्पना सेन्सर मुळं मिळेल
- अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल अन तातडीची मदतही पोहचेल.-या प्रकल्पासाठी 340 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.
इतर महत्वाची बातमी-
Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता