Pune PMC Budget 2024 : भिडे वाडा ते ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प; पुणे महापालिकेचं बजेट जाहीर, पुणेकरांना काय मिळणार?
पुणे महापालिकेचे 2024- 25 या वर्षीचे 11 हजार 601 कोटी (Pune PMC Budget 2024)रुपयांचे अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी मंजूर केले.
पुणे : पुणे महापालिकेचे 2024- 25 या वर्षीचे 11 हजार 601 कोटी (Pune PMC Budget 2024)रुपयांचे अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी मंजूर केले. समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रुपये भरीव तरतूद करण्यात आली असून पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहतील असा दावा, विक्रम कुमार यांनी केला.
मेट्रोचे नवीन रूट, पीएमपीएमएल साठी 500 बसेस, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या मिस्सिंग लिंकच्या कामासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जायका अंतर्गत सुरू असलेले एसटीपी प्लांट उभारणी, नदी काठ सुधार योजना ही कामे देखील मार्गी लावण्यात येतील. शहरातील तीन तलावांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. कचऱ्यापासून वीज आणि हायड्रोजन निर्मितीचे प्लांट सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी मॉडेल स्कूल योजनेत अधिकच्या शाळा घेण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत यासाठी जेनेरिक स्टोरची संख्या वाढवण्यात येणार आहे.
बजेट मधील प्रमुख तरतुदी.
पाणी पुरवठा - 1537 कोटी
ड्रेनेजसाठी - 1263 कोटी.
कचरा व्यवस्थापन -922 कोटी.
आरोग्य - 515 कोटी
रस्त्यासाठी - 1276 कोटी
PMPML बस - 482 कोटी.
शिक्षण - 900 कोटी.
महापलिकेचे प्रमुख उत्पन्न कुठून येणार -
GST/LBT - 3 हजार कोटी.
मिळकत कर - 2500 कोटी.
विकास शुल्क - 2492 कोटी.
पाणी पट्टी - 495 कोटी.
शासकीय अनुदान - 1762 कोटी.
अंदाज पत्रकातील ठळक मुद्दे
- नवीन कॅथ लॉब सुरु करणार
- कॅन्सर तपसाणीसाठी सेंटर उभारणार
- महापालिकेच्या 19 रुग्णालयांमध्ये स्वस्त दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी मेडिकल सुरु करणार
- वैद्यकिय महाविद्यालयाचे काम पूर्ण करणार, 500 बेडचे रुग्णालय उभारले जाणार
- ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प सुरु करणार
- वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट, 13 मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट
- 600 हेक्टरमध्ये टीपीस्कीम
- बाणेर भागात भाड्याने घर उपलब्ध करुन देणार
- महापालिका हद्दीत 8 उड्डाणपूलाचे कामे करणार
- यंदा कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण करणार
- 350 किलोवॉट हायड्रोजन वीज निर्मितीचे उद्दिष्ट
- अण्णाभाऊ साठे स्मारक
- भीडे वाड्याचे काम सुरु करणार
- महात्मा फुले स्मारकराच्या कॉरीडॉरचे काम सुरु करणार
- 200 फायरमनची भरती करणार
- बाणेर, खराडी, धायरी, महंमदवाडी, बावधन या ठिकाणी फायर स्टेशन उभारले जाणार
- नवीन हॉटमिक्स प्रकल्पांचा प्रस्ताव
महापालिका भाड्याने घर देणार
शहरातील वाढती लोकसंख्येचा विचार करता तसेच नव्याने महापालिका हद्दीत राहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता, त्यांच्यासोयीसुविधेचा विचार देखील महापालिकेकडून केला जात आहे. महापालिकेने नुकतीच पंतप्रधान आवास योजना यशस्वी करुन दाखविली. सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यानंतर आता महापालिकेने भाड्याने घर देण्याची नवीन योजना यंदा लागू केली आहे. बाणेर भागात महापालिकेच्या सुमारे 6000 एकर जागेवर बांधकाम प्रकल्प राबवून भाड्याने घर दिले जाणार आहे.
पुणेकरांना काय मिळणार?
शहराला योग्य दिशा दाखविणारे हे बजेट आहे. पुणेकरांच्या राहणीमान उंचावण्यासाठी मोठी मदत होणार आहे. शहरात चांगले रस्ते, गार्डन, परिसरात स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याचा देखील विचार करण्यात आला आहे. तसेच या बजेटनुसार राबिण्यात येणाऱ्या योजना पुणेकरांना फायदेशीर ठरतील, असं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाची बातमी-