Pune PMC Job : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, मेगा भरती सुरु, शिक्षण, जागा अन् पगार, जाणून घ्या एका क्लिकवर!
पुणे महानगरपालिकेत इंजीनियर्ससाठी मेगाभरती सुरु करण्यात आलीये. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Pune PMC Job : तुम्ही इंजिनिअर असाल आणि नोकरीच्या शोधात (Pune PMC) असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. पुणे महानगरपालिकेत आजपासूनच मेगा भरती सुरू झालेली आहे. या मेगा भरतीची माहिती पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली. तुम्हाल सुद्धा या भरतीमध्ये नाव नोंदवायचं असेल तर तुम्ही वेळ न घालवता आजच अर्ज भरा. ही भरती नेमकी कशाची आहे किती जागांसाठी आहे आणि यात किती पगार असणार आहे याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊया.
पुणे महानगरपालिकेने वर्षाच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी सगळ्यांसाठी दिली आहे. नोकरीसाठी धडपडत असणारे आणि मेगा भरतीची वाट पाहणारे यांच्यासाठी ही भरती आता लवकरच सुरू केली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेने ही बातमी देताच अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरायला घेतले आहेत. तुम्हाला देखील या मेगा भरतीमध्ये तुमचं नाव नोंदवायचं असेल तर वेळ न घालवता आजच हा अर्ज भरून घ्या. या भरती प्रक्रियेच्या अधिसूचनासुद्धा आत्ताच प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मेगा भरती मध्ये नोकरीचे ठिकाण पुणेच असेल.
113 जुनियर इंजिनियर पदासाठी भरती
पुणे महानगरपालिकेमध्ये आता तुम्हाला देखील नोकरी करण्याची संधी निर्माण झाली आहे. एकूण 113 पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे. 113 जुनियर इंजिनियर पदासाठी ही भरती राबवली जाणार आहे.ही मेगा भरती पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाकडून राबवण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची ही अट ठेवण्यात आली आहे. अर्जदाराचे इंजीनियरिंग मधून शिक्षण पूर्ण झाले असले पाहिजे. गेल्या वर्षी झालेल्या भरतीमध्ये तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं होतं. मात्र यावर्षी पुणे महानगरपालिकेने अशी कोणतीही अट घातलेली नाही आहे त्यामुळे आत्ताच शिक्षण पूर्ण झालेला अभियंता सुद्धा या मेघा भरतीमध्ये आपलं नाव नोंदवू शकतो. या भरती प्रक्रियेमध्ये 113 जागांपैकी काही जागा आरक्षित करून ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 13 जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. उरलेल्या 100 जागा या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठेवण्यात आले आहेत.
16 जानेवारीपासून भरतीसाठी अर्ज करू शकता
16 जानेवारी 2024 पासून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून या भरती प्रक्रियेची माहिती देण्यात आली. 2023 म्हणजेच गेल्या वर्षी 135 जूनियर इंजिनियर्स साठी ही भरती प्रक्रिया महानगरपालिकेने राबवली होती. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला तीन वर्ष अनुभवाची अट घालण्यात आली होती. 2023 मध्ये 12500 उमेदवारांनी या मेगा भरती मध्ये आपला सहभाग दाखवला. गेल्यावर्षीचा अंदाज बांधता यावर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये देखील उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा वर्तवली जात आहे.
इतर महत्वाची बातमी-
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी, आयारामांना आळा घालण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय