एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Pune News : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा वादात; मावळमधील सत्ताधाऱ्यांसह शेतकऱ्यांचा मोर्चा, राज्य सरकारच्या अडचणी वाढणार?

पिंपरी चिंचवड शहरासाठी महत्वकांक्षी असणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने या प्रकल्पावरील स्थगिती हटवताना मावळकरांना विश्वासात घेतलं नाही, असा आरोप मावळकरांनी केला आहे.

पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpri- Chinchwad) शहरासाठी महत्वकांक्षी असणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने या प्रकल्पावरील स्थगिती हटवताना मावळकरांना विश्वासात घेतलं नाही. म्हणूनच आज सत्ताधारी, विरोधी पक्षांसह शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. वडगाव मावळ तहसील कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढत, राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती हटवल्यानंतर, 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या गोळीबाराच्या जखमा पुन्हा ताज्या झालेल्या आहेत. त्यावेळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आंदोलन गोळीबार करत चिरडण्यात आले होते. यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू तर काही शेतकरी जखमी झाले होते. हे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने केल्याचा घणाघाती आरोप भाजप-शिवसेनेच्या युतीनं केला होता. पण अलीकडे पुलाखालून बरंच पाणी वाहिलेलं आहे.

 सध्याच्या बदलेल्या परिस्थितीत अजित पवार महायुतीच्या सत्तेत आहेत. त्यांना येऊन अडीच महिने ही उलटले नाहीत, तोवर या महायुतीच्या सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनीवरील स्थगिती उठवून टाकली. या निर्णयाचा फटका मावळच्या शेतकऱ्यांना बसणार आहे, असं असताना मावळमधील महायुतीचे आणि अजित दादांचे कट्टर आमदार सुनील शेळके, देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह शेतकऱ्यांना सरकारकडून अंधारात ठेवण्यात आलं. तसं उघडपणे या दोघांनी ही भाष्य केलं. पण त्याचवेळी पिंपरी चिंचवडमधील महायुतीने या निर्णयाचं स्वागत करत सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला. 

यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महायुती विरुद्ध मावळ महायुती, असा संघर्ष निर्माण झाल्याचं उघडपणे पहायला मिळतंय. तर दुसरीकडे मावळ मधील सर्व पक्षीय शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. ते राज्य सरकारला घेरत आहेत. हा प्रकल्प राबवताना आमचा नेमका काय विचार केलाय? असा खडा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. यात सत्ताधारी महायुतीने स्थानिक नेते ही आघाडीवर आहेत. त्यामुळं हा पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचा पेच वाढतोय की क्षमतोय, हे पुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.

2008 मध्ये पालिकेकडून जलवाहिनी प्रकल्प राबविण्याचे काम हाती घेतलं पण...

2008 मध्ये पालिकेकडून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविण्याचे काम हाती घेण्यात आले. थेट पवना धरणातून निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रात अतिरिक्त 100 एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीतून आणण्यात येणार होते. पवना धरण ते निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत असे एकूण 34.71 किलोमीटर अंतराची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार होती. त्यापैकी महापालिका हद्दीतील 4.40 किलोमीटर भूमिगत जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. मात्र, मावळातील शेतकऱ्यांनी 9 ऑगस्ट 2011 रोजी कडाडून विरोध झाला. शेतकरी जागा देण्यास तयार नसल्यामुळे जमिनीचे अधिग्रहण रखडले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

GulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटीलNitin Gadkari Nagpur Bus : विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
गुहेतून सापडला 188 वर्षांचा वृद्ध? कोणी म्हणतंय सियाराम बाबा तर कोणी म्हणतंय खोटारडेपणा, नक्की प्रकार काय?
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात...  या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
सोशल मीडियावर नंबर वन पण कामात... या महिला अधिकाऱ्याच्या बदलीची देशभरात चर्चा
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Embed widget