एक्स्प्लोर
Bollywood Park : 'तीनशे कोटींचा प्रकल्प रद्द, स्थानिकांच्या विरोधानंतर मोठा निर्णय
एमएमआरडीए (MMRDA) ने वांद्रे ते जुहू दरम्यान मेट्रो लाईन २ए खाली प्रस्तावित केलेला ३०० कोटी रुपयांचा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प अखेर रद्द केला आहे. स्थानिक नागरिक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक असिफ झकेरिया (Asif Zakaria) यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प म्हणजे 'जनतेच्या पैशाचा गैरवापर' असल्याचा आरोप असिफ झकेरिया यांनी केला होता. मेट्रोच्या ३५५ खांबांवर हा थीम पार्क उभारला जाणार होता आणि त्याला एमएमआरडीएने मंजुरीही दिली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे झालेल्या बैठकीत हा प्रकल्प रद्द करण्यात आला. या प्रकल्पासाठी मंजूर झालेला निधी इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरण्यात यावा, अशा सूचना मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















