Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
सावरकरांना सोडवण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले: शरद पोंक्षे
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबाराव सावरकर अंदमानात असताना त्यांचे धाकटे बंधू नारायण सावरकर त्यावेळी इथे होते. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे होते. नारायण सावरकर यांनी गांधींना विचारलं दोन्ही बंधू अडकलेत त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही काही करु शकता का? त्यावर गांधीजी म्हणाले, तुम्ही तुमच्या मार्गाने प्रयत्न करा, मी माझ्या मार्गाने करतो. गांधींनी सावरकरांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले, याचे पुरावेही आहेत. काँग्रेसवाल्यांना हे माहितीही नसेल की, सावरकांना सोडवायला गांधींनी प्रयत्न केलेत. अभ्यास नसल्याने काहीही बोलतात, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
बारामतीत आढळला 50 किलो भेसळयुक्त खवा.. अन्न औषध प्रशासनाची कारवाई
बारामती शहरात आज अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी धाडसत्र राबवण्यात आले होते. त्यामध्ये शहरातील भिगवण रस्त्यावरील हिंद स्वीटस या मिठाईच्या दुकानामध्ये तब्बल 50 किलो भेसळयुक्त खवा आढळून आला आहे. पामोलीन तेल, दूध पावडर आणि रंग यापासून बनवलेला पदार्थ खवा म्हणून विकत होते. पेठा, बर्फी इत्यादी अन्न पदार्थ बनवून विक्री करत होते. त्यामुळे दुकान बंद केलं आहे. दिवाळीच्या तोंडावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाने संबंधित खवा पुरवठादारही शोधला असून त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, भेसळयुक्त खवा मिळून आल्यानंतर अन्न औषध प्रशासनाकडून हिंद स्वीटस हे मिठाईचे दुकान 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पुण्यातील बालेवाडीत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळला; अग्निशमन दलाच्या 6 फायरगाड्या घटनास्थळी दाखल
बालेवाडी, पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. काही जण जखमी किंवा अडकल्याची प्राथमिक माहिती असून पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या 6 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दल पोहोचण्यापुर्वी 12 जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत. या बिल्डिंगचा रात्री स्लॅब( काँक्रीट भरण्याचं) काम सुरु होतो त्यावेळी अचानक स्लॅब कोसळले. रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी या बिल्डिंगचा काम सुरू होतं आणि बारा कामगार काम करत होती. या दुर्घटनेत आठ कामगार जखमी झाले आहेत तातडीने त्यांना रात्री जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. रात्री पोलिसांना देखील घ्या संदर्भात माहिती देण्यात आली होती.