Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
पुणे कोरोना अपडेट : रविवार दि. ७ नोव्हेंबर, २०२१
पुण्यात 24 तासांत 69 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 82 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुणेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, शहरात कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. पुण्यात सध्या 657 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. मृतांची एकूण संख्या ९ हजार ०७७ इतकी स्थिर झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ६५७ रुग्णांपैकी १०३ रुग्ण गंभीर तर ७३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात ५ हजार ६६७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३५ लाख ८२ हजार ५० इतकी झाली आहे.शहरातील ८२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ९५ हजार २५ झाली आहे.
तेव्हा राज्यातील भाजप कुठे होतं?, आमदार रोहित पवारांचा सवाल
गेल्या 6 वर्षात तिप्पट दर आधीच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर लावले आहेत. आतापर्यंत अतिरिक्त 8 लाख कोटी गोळा केले तेव्हा राज्यातील भाजप कुठे होतं? लोकसभेच्या पोटनिवडणुका होतात तेव्हा दर कमी होतात. आताही यूपी च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे दर कमी होताहेत का? आमदार रोहित पवारांचा सवाल
वाल्हेकरवाडीत 3 ते 4 जणांच्या टोळक्याचा राडा, वाहनांची तोडफोड
पिंपरी चिंचवड वाल्हेकरवाडी 3 ते 4 जणांच्या टोळक्याचा राडा. वाल्हेकरवाडी परिसरातील रस्त्यालगत पार्क केलेल्या 8 वाहनांची केली तोडफोड. मिनी बस,कार या वाहनांचे नुकसान. ही तोडफोड करून हे आरोपी फरार झालेत. पोलोसांकडून शोध सुरू
पुण्यात गेल्या 24 तासात 47 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 57 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 47 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 57 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495082 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 647 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3695 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.