एक्स्प्लोर

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background

बंडगार्डन पोलिसांकडून चोरट्यास अटक, 13 दुचाकी जप्त 

 "लॉकडाऊन'मध्ये हातचा रोजगार गेला, त्यानंतर पैसे कमाविण्यासाठी त्याने थेट वाहनचोरीचाच मार्ग निवडला. एवढेच नव्हे, तर ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्यानंतर त्याने दुचाकी चोरीला सुरूवात केली. या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातुन 13 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अख्तर चांद मुजावर (वय 44, रा.बनवडी, कोरेगाव, सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अख्तर मुजावर हा ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या नातेवाईकांना ऑगस्ट महिन्यात भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने दुचाकी चोरीली. तेथून पुढे त्याने नियमीतपणे वाहनचोरी सुरू केली. चोरलेल्या दुचाकी विकण्याचा प्रयत्न केला. मात्र कागदपत्रे नसल्याने ग्रामीण भागातील त्याच्याकडील दुचाकी घेतल्या नाहीत.'

महिलेला भेटण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण, एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

पुण्यातील कोंढवा परिसरातून  एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. एका महिलेला भेटण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रवी कचरू नागदिवे (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेत एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. मयत रवी हा उरळीकांचन येथून कोंढवा परिसरात एका महिलेला भेटण्यासाठी रिक्षा करून आला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी रवी आणि रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये रवीचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत आणि जखमी दोघांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग - किरीट सोमैया

उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणं. कारण सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमैय्यांनी तुरुंगाच्या भाषेवर अक्षरशः यु टर्न घेतला आहे. प्रत्येकवेळी तुम्ही अजित पवार तुरुंगात जाणार असं म्हणता पण प्रत्यक्षात तसं घडतच नाही. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का? असा प्रश्न पिंपरी चिंचवडमधील पत्रकार परिषदेत सोमैय्यांना विचारण्यात आला. तेंव्हा तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पहा. असं म्हणत तुरुंगात जाणं म्हणजेच कारवाई होणं आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा. असं उलट आवाहन सोमैयांनी केलं. पण हे करताना अजित पवार तुरुंगात जाणार नाहीत हे सोमैयांनी यावेळी जणू स्पष्ट केलं. 

17:58 PM (IST)  •  24 Nov 2021

पुण्यात गेल्या 24 तासात 95 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 106 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 95 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496279 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 823 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4842 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

16:10 PM (IST)  •  24 Nov 2021

पुण्यात दिवसाढवळ्या पडला दरोडा

पुण्यात दिवसाढवळ्या धाडसी दरोडा पडला आहे. दरोड्यावेळी झालेल्या गोळीबारात एक गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. अनंत पतसंस्थेत दोन अज्ञात घुसले, मॅनेजरकडे पैश्याची मागणी केली. नकार देताच त्यांच्यावर गोळीबार केला आणि दोन ते अडीच लाखांची रोकड लंपास केली. जुन्नर तालुक्यातील कांदळी गावात ही धक्कादायक घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. नारायणगाव पोलीस त्या चोरट्यांच्या शोधात आहेत, तर जखमीला रुग्णालयात दाखल केलं आहे. बँक मॅनेजर राजेंद्र भोर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

19:41 PM (IST)  •  23 Nov 2021

पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगतापांच्या कार्यलयावर हल्ला करण्याचा प्रयत्न

दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांचं कृत्य, रॉकेलने भरलेल्या पेटत्या बॉटल कार्यालयाच्या दिशेने फेकल्या आहेत. सुदैवाने एक बाटली खांबाला लागून फुटली तर दुसरी कार्यालया लगतच्या शटरवर पडली. त्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही. पिंपळेगुरवमध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. सांगवी पोलिसांकडून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या त्या तिघांचा शोध सुरू आहे. आमदारांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यवसायिक आहेत. पण हे हल्लेखोर नेमके कोण आहेत? की त्यांना कोणी पाठवलं होतं? याचा तपास सुरू आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Embed widget