(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराववर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
कोंढव्यात हुक्का गोडावूनवर पोलिसांचा छापा; 22 लाखाचा मुद्देमाल जप्त
मुंढवा पोलिसांनी येवलेवाडी परिसरातील एका हुक्का गोडावूनवर छापा मारून कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी 22 लाख 17 हजार रुपये किंमतीचा हुक्का आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणाहून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शहेजाद अश्रफ रंगूनवाला (वय 37), नवेद मुंने खान (वय 21) आणि शरीफ मोहम्मद मालापुरी (वय 18) या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2018 चे कलम 4 अ 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या
लोकसत्ताच्या पुणे आवृत्तीचे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांनी कोथरुडमधील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजेंद्र येवलेकर विज्ञान विषयक लिखाणासाठी ओळखले जात. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि तीन भाऊ आहेत. राजेंद्र येवलेकर यांनी आत्महत्या का केली हे मात्र अजुन समजु शकलेले नाही. कोथरुड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर
अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याच नक्की झाला आहे. या दौऱ्यात पुण्यातील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेशन या संस्थेत अमित शहांकच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलय. या कार्यक्रमानंतर अमित शहा पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचीही शक्यता आहे.
ण्यात गेल्या 24 तासात 92 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 47 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 92 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 495729 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात दोन कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 886 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4797नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
अमित शहांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणे टाळले , त्याऐवजी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात करणार
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात अमित शहा पुण्यातील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कोऑपरेशन या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर अमित शहा पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देतील असं सांगण्यात आलं होतं. पुणे दौऱ्यात शहांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी यासाठी संस्थेचे प्रमुख या नात्याने शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याच आमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस शहांनी हे आमंत्रण स्वीकारल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले होते. मात्र पुणे भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या अमित शहांच्या पुणे दौऱ्यात व्ही एस आय चा उल्लेख नाही. त्याऐवजी अमित शहा पुणे महापालिकेत भेट देणार आहेत. त्यानंतर अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यातील गणेश कला- क्रीडा संकुलात भाजपकडुन कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. अमित शहांचा अधिकृत दौरा अजुन आलेला नसला तरी पुणे भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अमित शहांच्या दौऱ्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा समावेश नव्हताच असं म्हटले आहे.
देहूरोडमधील एका बुलेटस्वाराच्या गाडीतून चोरट्याने केले बाटली भरून पेट्रोल लंपास
पेट्रोलचे दर शंभरी पार झाल्यापासून दुचाकीस्वार हैराण झालेत. यातूनच पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढू लागलंय. अशीच एक चोरी सीसीटीव्हीत देखील कैद झालीये. देहूरोडमधील एका बुलेटस्वाराच्या गाडीतून चोरट्याने बाटली भरून पेट्रोल लंपास केलं. अनेकदा असा प्रकार त्याच्यासोबत घडत होता, म्हणूनच त्याने सीसीटीव्ही रिसिव्हर तपासलं. तेंव्हा पेट्रोल चोरी होत असल्याचं निष्पन्न झालं. एकतर प्रति किलोमीटर त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतायेत अन दुसरीकडे पेट्रोल चोरट्यांनी डोकेदुखी वाढवली आहे.