Ajit Pawar : स्वच्छतेची शपथ देताच महिला ओरडली, दादा आमच्याकडं कचरा गाडी येत नाही; अजितदादा म्हणाले, म्हणूनच दादा आलाय; पुढे काय घडलं?
महिलेनं पुढे व्यासपीठाकडे जाताना आम्हाला बोलू द्या, अशी विनंती केली. तसेच मुलांना काम नसल्याची कैफियत मांडली. यानंतर अजित पवारांनी सूचना केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी महिलेची तक्रार लिहून घेतली.
Ajit Pawar in Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामतीकरांनी स्वच्छतेचं महत्व सांगून शपथही दिली. यावेळी एका महिलेनं स्वच्छतेची शपथ घेऊन अगदी धाडसाने अजित पवार यांनी शपथ देऊन पूर्ण करताच दादा आमच्याकडे कचऱ्याची गाडी येत नाही, अशी तक्रार केली. यावेळी अजित पवार यांनीही त्यांच्याच शैलीत उत्तर देत दादा म्हणूनच आला असे सांगितले.
महिलेच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले...
महिलेच्या तक्रारीचं निरसन करताना अजित पवार पुढे म्हणाले की, आता गाडी येत नाही ना? आता दादाच आला आहे. या महिलेनं परत आवाज देताच अजित पवार यांनी ताई तुमची सूचना योग्य आहे. सांगतो मी सांगतो म्हणाले. त्या महिलेनं पुन्हा आमच्याकडे सोय नाही असं सांगितलं. त्यावेळी त्या संबंधित महिलेला अजित पवार यांनी समोर येण्यास सांगितलं. तसेच बाजूला असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी गाडी रोजच्या रोज पाठवा, अशा सूचना व्यासपीठावरूनच केल्या. महिलेनं पुढे व्यासपीठाकडे जाताना आम्हाला बोलू द्या, अशी विनंती केली. तसेच मुलांना काम नसल्याची कैफियत मांडली. यानंतर अजित पवारांनी सूचना केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी महिलेची तक्रार लिहून घेतली व कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
अजित पवारांचा बारामतीत पहिल्यांदाच जनता दरबार..
दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारमध्येउपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सत्तेत सामील झाल्यानंतर आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार भरला. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे अजीत पवारांचा जनता दरबार झाला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांचा जनता दरबार बंद होता. मात्र आज सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच जनता दरबार भरला.
नागरिकांची कामे जागच्या जागी मार्गी लावण्याचा प्रयत्न
सत्ता असो वा नसो उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच बारामतीत जनता दरबार घेत असतात. या जनता दरबारात नागरिकांची कामे जागच्या जागी मार्गी लावण्याचा पवार यांचा प्रयत्न असतो. या जनता दरबारावेळी विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतात. नागरिकांचे ज्या विभागाशी कामे आहेत. त्या त्या विभागाला सूचना करत नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावतात. विशेष बाब म्हणजे बारामतीकरांना आपली कामे घेऊन पुणे, मुंबई या सारख्या ठिकाणी यावे लागू नये म्हणून बारामतीत नियमित जनता दरबार घेत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या