Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या नेत्यांंचं काय? जुन्नरची जागा कोणाची? अन् राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण?; शरद पवारांनी धडाधड सगळंच सांगून टाकलं!
जे आमदार आणि नेते भाजपसोबत गेले ते राष्ट्रवादीसोबत असूच शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
![Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या नेत्यांंचं काय? जुन्नरची जागा कोणाची? अन् राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण?; शरद पवारांनी धडाधड सगळंच सांगून टाकलं! Sharad Pawar statement on junnar Loksabha and vidhansabha election ajit pawar political crisis Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या नेत्यांंचं काय? जुन्नरची जागा कोणाची? अन् राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण?; शरद पवारांनी धडाधड सगळंच सांगून टाकलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/9c8030e9afa2b3ab6a8f639fc5ef91ef1683027592464614_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : अजित पवार (Ajit pawar) गटात गेलेल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर आणि नेत्यांवर शरद पवार यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. जे आमदार आणि नेते भाजपसोबत गेले ते राष्ट्रवादीसोबत असूच शकत नाही, असं म्हणत त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. ते जुन्नरमध्ये बोलत होते. त्यासोबतच जुन्नरच्या जागेवरदेखील त्यांनी दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची चर्चा रंगली मात्र राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण हे जनतेला चांगलंच माहित आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन वेगवेगळी विधानं केली जात आहे. मात्र यावरुन कार्यकर्ते चांगलेच संभ्रमात पडले आहेत. त्यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी मागील अनेक दिवसांपासून मी राज्यभर फिरत आहे. अनेक लोकांना भेटतो. सर्वसामान्य लोकं अनेक बाबतीत स्पष्ट असतात. सामान्य माणूस काय विचार करतो हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. काल किल्लारीला गेलो तेव्हा 20 हजार लोक त्याठिकणी एकत्र आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण हे जनतेला चांगलंच माहित आहे', असं ते म्हणाले.
'मोदीच्या येण्याने खड्डेतरी बुजतील'
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन महिन्यात दुसऱ्यांदा पुण्यात येत आहे. त्याचं लक्ष पुण्याकडे लागल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या दौऱ्यावर शरद पवारांनी खोचक टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान पुण्यात येत आहे ही बाब चांगली आहे. त्यामुळे निदान पुण्यातील रस्ते बुजवले जातील,असं ते म्हणाले.
इंडिया आघाडीची सभा कधी?
इंडिय़ा आघाडीच्या देशपातळीवरील सभेबाबत बोलताना ते म्हणाले की, या सभेबाबत इंडिया आघाडीत चर्चा झाली आहे. मध्य प्रदेशपासून सभेला सुरुवात करावी, असा आमचा आग्रह आहे. त्यावर पुन्हा चर्चा होणार आहे. पुढच्या 18 दिवसांमध्ये या सभेच्या नियोजनाचं काम सुरु होणार आहे.
'जे लोक भाजपसोबत गेले ते लोक राष्ट्रवादीचे असूच शकत नाही'
भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरद पवार यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ते म्हणाले की जे लोक भाजपसोबत गेले ते लोक राष्ट्रवादीचे असूच शकत नाही. त्यांनी भाजपबरोबर जायची भमिका घेऊन तडजोड करण्याचा विचार करत असेल तर तो विचार आम्ही स्विकारणार नाही. त्यासोबतच मतदानपेटीतून मी आणि राष्ट्रवादी कोणाच्या मनात आहे, हे नक्कीच कळेल, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)