एक्स्प्लोर

Sasoon Hospital: बाहेरील औषधं लिहून देण्यास ससूनमधील डॉक्टरांना बंदी; सर्व औषधं मोफत मिळणार

Pune News: डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरची औषधे लिहून देऊ नयेत यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार संचालित ससून हॉस्पिटल पुणे यांनी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आता सगळ्यांना मोफत औषधं मिळणार आहेत.

Sasoon Hospital : डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरची औषधे लिहून देऊ नयेत, (Sassoon Hospital) यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार संचालित ससून हॉस्पिटल पुणे यांनी उपाययोजना केल्या आहेत. रूग्णांना स्वतःची औषधे, सिरिंज किंवा इतर वैद्यकीय साहित्य खरेदी करावे लागणार नाही, याची खात्री करण्यासाठी रूग्णालयात 255 आवश्यक औषधे आणि 480 वारंवार लिहून दिलेली औषधे आता रुग्णालयाकडूनच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सरकारी रुग्णालयात येणारे रुग्ण सामान्यतः आर्थिक दृष्या सक्षम नसतात आणि त्यांना स्वतःच्या औषधांसाठी पैसे देण्यास सांगणे अस्वीकार्य आहे, असे बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे आता सगळ्यांना मोफत औषधं मिळणार आहेत.

रूग्णालयातील डॉक्टर रूग्णांना आवश्यक औषधे खरेदी करण्यासाठी रूग्णालयाच्या बाहेरील फार्मसीमध्ये पाठवत होते. ज्यामुळे अनेकांना त्यांच्यासाठी पैसे जमा करावे लागत होते. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेरची औषधे लिहून देऊ नयेत यासाठी BJGMC आणि ससून हॉस्पिटलने हॉस्पिटलमध्ये आवश्यक औषधांचा साठा करण्याची व्यवस्था केली आहे. रुग्णालयाने नवीन औषधे खरेदी केली आहेत आणि जुनी अपग्रेड केली आहेत, डॉक्टरांना अद्ययावत औषधे उपलब्ध आहेत, याची खात्री करून दिली आहे, असं डॉ. ठाकूर यांनी सांगितलं आहे. 

बाहेरून औषधे लिहून दिल्यास डॉक्टर आणि विभागप्रमुखांवर कारवाई होईल. काही महत्वाच्या केसेसमध्येच प्रिस्क्रिप्शनला परवानगी दिली जाईल. औषधे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी रुग्णालयाच्या औषध दुकानाजवळ कर्मचारी नियुक्त केले जातील. यात काही चुकीचा प्रकार आढळल्यास योग्य कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

पुण्यातील ससून रुग्णालयात पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक भागातून ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येत असतात. उत्तम आणि कमी खर्चात उपचार होतात. त्यामुळे अनेक नागरिक ससून रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणारे नागरीक आणि सर्वसामान्य नागरिक रुग्णालयात उपचारासाठी जास्त प्रमाणात येतात. याच नागरिकांना बाहेरील औषधं डॉक्टरांकडून लिहून दिली जात होती. त्यामुळे अनेक नागरिकांना या औषधांसाठी पैसे गोळा करणं शक्य होत नव्हतं. परिणामी नागरिक आणि रुग्णांना पैशासाठी वणवण करावी लागत होती. त्यामुळे ससून रुग्णालयातील डीनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रुग्णांना दिलासा...

बाहेरील औषधं लिहून दिल्याने अनेक नागरिकांना ही औषधं घेण्यासाठी फिरावं लागत होतं. सगळेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पुण्यातील नसून बाहेरील शहरातील असतात. त्यामुळे त्यांना शहरासंदर्भात फार माहिती नसते त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
Beed Crime: माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
माझ्याकडे 100 टिप्पर सोडा, साधा टायरही नाही, पोरीचं लग्न कर्ज काढून केलंय, भास्कर केंद्रे गुणरत्न सदावर्तेंना नेमकं काय म्हणाला?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
Embed widget