पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Pune Metro : पुणे मेट्रोने 30 जून रोजी 1,99,437 प्रवाशांची विक्रमी संख्या गाठून तब्बल 24,15,693 ची एकूण कमाई केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे.
पुणे: पुणे मेट्रोची (Pune Metro) विस्तारित मार्गांवरील सेवा सुरू झाली आहे. वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पुणे मेट्रोने 30 जून रोजी 1,99,437 प्रवाशांची विक्रमी संख्या गाठून तब्बल 24,15,693 ची एकूण कमाई केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे.1,99,437 प्रवाशांपैकी 83, 426 प्रवाशांनी लाईन एकवरून (पीसीएमसी ते जिल्हा न्यायालय) तर 1,16,011, प्रवाशांनी लाईन दोनवरून मेट्रोने प्रवास केला आहे.
पीसीएमसी मेट्रो स्थानकात सर्वाधिक 19,919 प्रवाशांची नोंद झाली, त्यापाठोपाठ पीएमसी (18,079), शिवाजीनगर (17,046), पुणे
रेल्वे स्थानक (15,378) आणि रामवाडी (14770) येथे प्रवाशांची सर्वाधिक नोंद झाली. याव्यतिरिक्त, जिल्हा न्यायालय स्थानकावरून सुमारे 51,026 प्रवाशांनी त्यांची मार्गिका बदलली . यापूर्वी, 15 ऑगस्ट रोजी 1,68,012 प्रवाशांसह आणि 6 ऑगस्ट 2023 रोजी लाइन 1 आणि लाइन 2 या दोन्ही मार्गावर तब्बल 1, 31, 027 प्रवाशांसह सर्वाधिक प्रवासी नोंदवले गेले होते. विशेष म्हणजे, लाईन एकने 16 जून 2024 रोजी 36, 932 प्रवाशांची सर्वाधिक संख्या गाठली, तर लाईन दोनने 25 जून 2024 रोजी 64,378 प्रवाशांसह शिखर गाठले.
15 ऑगस्ट 1,68, 012 प्रवाशांसह आणि 6 ऑगस्ट 2023 रोजी लाइन 1 आणि लाइन 2 या दोन्ही मार्गावर तब्बल 1,31,027 प्रवाशांसह सर्वाधिक प्रवासी नोंदवले गेले होते. विशेष म्हणजे, लाईन एकने 16 जून 2024 रोजी 36,932 प्रवाशांची सर्वाधिक संख्या गाठली, तर लाईन दोनने 25 जून 2024 रोजी 64,378 प्रवाशांसह शिखर गाठले. ही आकडेवारी पुणे मेट्रोच्या वापरातील सातत्याने होत असलेली वाढ आणि पुणे मेट्रोने पुरवलेल्या सेवेच्या विश्वासार्हतेवरील जनतेचा विश्वास प्रतिबिंबित करत आहे.
पुणे मेट्रोच्या एक पुणे महाकार्ड आणि एक पुणे विदयार्थी महाकार्डमध्येही अनुक्रमे 39, 025 आणि 10,522 कार्डांची विक्री झाली आहे. काल, पीसीएमसी मेट्रो स्टेशन, पीएमसी, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्टेशन, रामवाडी, जिल्हा न्यायालय, वनाझ, डेक्कन जिमखाना, नश स्टॉप आणि भोसरी ही प्रवासी संख्येच्या बाबतीत विक्रमी 10 स्थानके होती.
पुण्यात वारकऱ्यांसाठी मेट्रो सफरचे आयोजन
पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळतर्फे वारकऱ्यांसाठी पुण्यात मेट्रो प्रवासाच आयोजन करण्यात आले. सिविल कोर्ट मेट्रो स्टेशन पासून पिंपरी मेट्रो स्टेशन पर्यंत वारकऱ्यांना मेट्रो प्रवासाचा आनंदघेता येणार आहे. मेट्रो प्रवासादरम्यान वारकरी विठू नामाचा गजर करणार आहे.
सकाळी सहापासून सुरू राहणार मेट्रो
पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 1 तास लवकर सुरू करीत आहे. वेळापत्रकाचा बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी 7 ते रात्री 10 अशीच सुरू असणार आहे.