एक्स्प्लोर
पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन
पुणे : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. लक्ष्मी रोडवरुन मिरवणुका अलका चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणुका सुरु आहेत. रस्त्यावर चौकात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
LIVE: पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचंही विसर्जन
LIVE : पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन
LIVE : गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी परदेशी पाहुण्यांची हजेरी, परदेशी तरुणांचा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष
LIVE : पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं अलका चौकात आगमन
LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन, कसबा गणपतीचं सलग दुसऱ्या वर्षी कृत्रिम हौदात विसर्जन
LIVE : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत ताल ढोल-ताशा पथकाचा आवाज घुमला
LIVE : पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचा थाट
LIVE : ढोल-ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
---------------
पुणे : दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन परतीच्या मार्गावर निघालेल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरापासून पांरपरिक बँडसह वैभवशाली मिरवणूक निघणार आहे.
मानाचा पहिला : कसबा गणपती
कसबा गणपती मंडळातर्फे सकाळी उत्सव मंडपातून श्रींचे प्रस्थान. त्यानंतर टिळक चौकामध्ये महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आदी मान्यवरांच्या हस्ते पूजा होऊन साधारणपणे 10.30 वाजता मिरवणुकीला सुरुवात. रमणबाग, शिववर्धन, कलावंत ही ढोल-ताशा पथके कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी असतील. पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पालखीतून गणरायाचे विसर्जन होणार आहे.मानाचा दुसरा : तांबडी जोगेश्वरी गणपती
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक सकाळी 10.30 वाजता मंडईतील टिळक पुतळपासून निघेल. मिरवणूकीत सतीश आढावचे नगारावादन होणार आहे पालखीतून मिरवणूक निघणार असू हौदात विसर्जन केले जाणार आहे.मानाचा तिसरा : गुरुजी तालीम गणपती
गुरुजी तालीम मंडळ विसर्जन मिरवणूकीला सकाळी 10 वाजता टिळक पुतळपासून सुरुवात होईल. लक्ष्मी रस्त्यानेने ही मिरवणुक निघणार आहे. दरमन टिळक पुतळ्याजवळ पालकमंत्री गिरिश बापट आणि प्रशांत जगताप यांच्या हस्ते श्रींची आरती केली जाणार आहे.मानाचा चौथा : गणपती तुळशीबाग
मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10.30 वाजता टिळक पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे. मिरवणुकीच्या सुरुवातीला पालकमंत्री व महापौरांच्या हस्ते श्रींची आरती होणार आहे. ही विसर्जन मिरवणुक लक्ष्मी रस्त्यावरुन निघणार आहे.मानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती
मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10.30 वाजता मंडईतील टिळक पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन प्रारंभ होणार आहे. शौर्य, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, चैतन्य गोखले यांचे ध्वजपथक हे मिरवणुकीत रंग भरणार आहेत.दगडूशेठ गणपती
दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाने श्री गणनायक रथ साकारला असून, 50 हजार मोतीच्या रंगाचे दिवे रथाला लावले आहेत. सायंकाळी 7 वाजता मंडई गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात येणार आहे संबंधित बातम्या :LIVE: दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाचं विसर्जन
बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी, मुंबईतल्या चौपाट्यांवर ड्रोनची नजर
पुढच्या वर्षी बाप्पांचं आगमन लवकर, मुक्कामही बारा दिवस
मुंबई-पुण्यात गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट
अरबी समुद्रात लालबागच्या राजाचं हायटेक विसर्जन
पुण्यात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी भाविक सज्ज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement