मोठी बातमी : पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नामांतर, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं नाव, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय?
Pune News : लोहगाव विमानतळाचे नाव आता बदलणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे नामकरण करण्यात येणार आहे.
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठा निर्णय घेतला आहे. पुणे (Pune News) येथील लोहगाव विमानतळाचे (Lohgaon Airport) नाव आता बदलणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे (Jagadguru Sant Tukaram Maharaj International Airport Pune) असे नामकरण करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे. त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा,’ अशी मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी राज्य सरकारकडे केली होती.
देवेंद्र फडणवीसांनी केली होती मोठी घोषणा
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमीपूजन सोहळ्यात याबाबत मोठी घोषणा केली. पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेचे स्वागत करत फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहोत, असंही फडणवीस यांनी भाषणात सांगितले.
प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही : नितीन गडकरी
पुण्यामध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देखील लोहमार्ग विमानतळाचा उल्लेख केला होता. लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. आम्ही केंद्रात पंतप्रधांनाकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही, असं नितीन गडकरी म्हणाले होते.
विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारचा मोठा निर्णय
आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते. लोहगाव विमानतळाचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं नामकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट