एक्स्प्लोर

Mahayuti Crisis: भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर

Mahayuti Crisis: अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे स्वतः उपस्थित होते, भाजपने बनसोडेंचा तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळं आता बनसोडे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपनंतर (BJP) अजित पवार गटाने नवा ठराव मंजूर केला आहे. भाजपने (BJP) बैठक घेऊन पिंपरी विधानसभेवर दावा केला, त्यानंतर आज अजित पवार गटाने ही बैठक घेतली त्यामध्ये भाजपच्या वाट्याला असणाऱ्या भोसरी-चिंचवड राष्ट्रवादीला घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच भाजप राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसेल तर आम्ही भोसरी आणि चिंचवडमध्ये ही प्रचार न करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असा इशारा ही द्यायला अजित पवार गट विसरला नाही. या बैठकीत अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे स्वतः उपस्थित होते, भाजपने बनसोडेंचा तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळं आता बनसोडे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

अण्णा बनसोडे काय म्हणालेत?

राज्यात युतीचं सरकार आहे. युतीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आहेत. तिन्ही पक्षाची युती असल्यामुळे युतीमध्ये सर्व नेत्यांचा असा निर्णय झालेला आहे, ज्या पक्षांचे ज्या ठिकाणी आमदार असणार आहेत, ती जागा त्या पक्षाच्या आमदारासाठी सोडण्यात येणार आहे. वास्तविक बघितलं तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे, विद्यमान आमदार आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे ही जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे. पण, काही लोकांना वाटतं आहे, की हा मतदार संघ त्यांना मिळाला पाहिजे. ते त्यांचं वैयक्तिक मत असणार आहे. पण युतीचा धर्म म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल त्यासाठी आम्ही बांधील आहोत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध

पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर लावल्याचं दिसून आलं. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे, अशी माहिती आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवाराचा कमी मताधिक्याने पराभव झाला होता, त्यामुळे ही जागा भाजपची आहे, या जागेवर कमळ फुललं पाहिजे, लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने सर्व कामे केली, प्रचार केला. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही, त्यामुळे या ठिकाणी भाजपचाच उमेदवार द्यावी अशी मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार असल्याचं भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget