हृदय पिळवटून टाकणारा अपघात, आईसमोरच मुलाला चिरडलं, पुण्यातील घटनेनं हळहळ!
Pune Crime News : पुण्यातील हडपसर परिसरात (Pune hadapsar) हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
Pune Crime News : पुण्यातील हडपसर परिसरात (Pune hadapsar) हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका डंपरने अॅक्टिव्हाला मागून जोरदार धडक (Accident) दिली, यामध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झालाय, तर आई गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सायंकाळच्या वेळी हडपसरमध्ये ही घटना घडली. भरधाव वेगात धावणाऱ्या डंपरने अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली. या अपघातमध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवत असलेली या मुलाची आई गंभीर रित्या जखमी झाली. जखमी आईला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
अपघात झाल्यानंतर डंपर चालकणाने घटनास्थळावर पळ काढला. पण संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. अपघातामध्ये मृत पावलेल्या चिमुकल्याचं वय फक्त सात वर्ष होतं. शौर्य सागर आव्हाळे असे मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. डंपरने अॅक्टिव्हाला धडक दिल्यानंतर तो डंपरच्या चाकाखाली आला, त्याचा जागीच मृत्यू झाला.
हडपसर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर उपस्थितीत जमावाने आणि मयत मुलाच्या नातेवाईकांनी सदर डंपरला आग लावली. सदरची माहिती प्राप्त झालेनंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. त्याशिवाय अग्निशामन दलही पोहचले. पोलिसांनी लोकांना पांगवल्यानंतर अग्निशामन दलाने आग विझवली. घटनास्थळावर पळ काढणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलेय.
कर्नाटकमध्येही घडली होती अशीच घटना -
कर्नाटकटच्या बिदरमध्ये एका इनोव्हा क्रिस्टा कारनं दोन वर्षांच्या मुलाला चिरडलं. यामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झाला. बिदर जिल्ह्यातील हरुगेरी परिसरातली ही घटना आहे. बसवचेतन पाटील असं या चिमुकल्याचं नाव आहे. सतीश पाटील आणि संगीता पाटील असं त्याच्या आई-वडिलांचं नाव आहे. गांधीगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या अपघाताबाबत हळहळ व्यक्त करण्यात येतेय. चालकाची 10 टक्के चूक आहेच, पण आई-वडिलांनी देखील मुलाकडे लक्ष ठेवायला हवं होतं, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
गाडी चालवताना चालक म्हणून काय काळजी घ्याल?
सोसायटीतून गाडी काढताना आजूबाजूला लहान मुलं आहेत का, याकडे लक्ष ठेवा.
रहिवासी इमारतींमध्ये गाडीचा वेग अतिशय कमी ठेवा.
लहान मुलं कुठल्याही दिशेनं पळत गाडीसमोर येऊ शकतात, हे ध्यानात ठेवा.
चालक म्हणून जबाबदारी तुमची आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.
शक्य झाल्यास गाडीला पुढे आणि मागे सेन्सर आणि कॅमेरे लावून घ्या.