Lata Mangeshkar : दीदी पंतप्रधान झाली असती, असं म्हणत आशा भोसलेंना अश्रू अनावर
Lata Mangeshkar : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Lata Mangeshkar : लता मंगेशकर गेल्या आणि जगात तणावमुक्त स्वर गेला. हा स्वर परत होणं शक्य नाही. लता दीदींना खडतर जीवन जगावं लागलं, पण धैर्याने त्यांनी सर्व गोष्टींचा सामना केला, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
श्रद्धांजली सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पंडीत हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, धनंजय केळकर आदी उपस्थित होते.
दीदी शिकल्या असत्या तर जगात सगळ्यात सुशिक्षिक्तांची रांगेत असत्या; मोहन भागवत भावूक
जगात सगळ्यांना तणाव मुक्त करणारा स्वर हरपला आहे. दादरा नगर हवेली धनाचा पुरवठा गेला, हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. दीदींचे जाणे मंगेशकर कुटुंबीयांसाठी वज्रघात होता. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. संगीताच्या क्षेत्रात हा स्वर पुन्हा होणे नाही. दीदींना दिरोदत्त स्वर मिळाला होता. लहानपणी अत्यंत खडतर जीवन त्यांच्या वाट्याला आले. मात्र, परिस्थितीचा त्यांनी धैर्याने सामना केला. दीदी जास्त शिकल्या नाहीत. मात्र, शिकल्या असत्या तर जगात सगळ्यात सुशिक्षिक्तांची रांगेत त्या असत्या. देशात कुणीही त्यांचे स्थान घेऊ शकणार नाही.अशा शब्दात मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली.
लता मंगेशकरांच्या आठवणीत आशा भोसलेंना अश्रू अनावर
भारतरत्न लता मंगेशकर यांची श्रध्दांजली सभा आज पुण्यात आयोजित केली होती. दरम्यान लता मंगेशकरांच्या आठवणीत आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांना अश्रू अनावर झाले. त्यांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. आशा भोसले म्हणाल्या,"लता दीदी खूप बुद्धिमान होती. ती पंतप्रधान झाली असती. लता दीदीला मंगेशकर आडनावाचा खूप अभिमान होता. तुमच्यासाठी लता मंगेशकर गेली आहे. पण आमच्यासाठी सगळं संपलं आहे".
संबंधित बातम्या
Important Days in March 2022 : मार्च महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध अणुयुद्धाच्या दिशेने? न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सेला अलर्ट राहण्याच्या पुतिन यांच्या सूचना
Maharashtra Corona Update : रविवारी राज्यात 782 नव्या रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha