एक्स्प्लोर
पुण्यात सिंहगडाच्या घाट रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक बंद
वीकेंड आणि पावसाचा योग साधून सिंहगडावर जाण्याचा बेत आखलेल्या हजारो पर्यटकांची निराशा झाली आहे.
पुणे : सिंहगड घाटात आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे गडावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असून वीकेंड आणि पावसाचा योग साधून सिंहगडावर जाण्याचा बेत आखलेल्या हजारो पर्यटकांची निराशा झाली आहे.
हवेली पोलिस आणि वन विभागाने गडावर जाणारा रस्ता बंद केला. पावसाळा, त्यातही रविवारी असल्यामुळे हजारो पर्यटक खडकवासला, सिंहगडावर धाव घेतात. परंतु या घटनेमुळे गडावरील रस्ता बंद होऊन अनेकांना अर्ध्या वाटेतून माघारी जावे लागले.
दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले असून यासाठी किती कालावधी लागणार याची निश्चित माहिती देता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र आज दिवसभर रस्ता बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे गेल्या वर्षी 30 जुलै रोजी संध्याकाळी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, तिथे जवळच आजचा प्रकार घडला आहे. गेल्या वर्षी सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळून असंख्य पर्यटक गडावर अडकून पडले होते.
सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मातीचा ढिगारा काढण्यात यश आल्यानंतर एकेरी वाहतूक सुरु करुन या पर्यटकांची सुटका करण्यात आली होती. यंदा सुदैवाने पहाटे हा प्रकार घडल्याने गडावर पर्यटक नव्हते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement