(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PCMC Crime News : अमित शहांच्या दौऱ्यासाठी चोख बंदोबस्त पण मध्यरात्री गाड्या...
आमित शहांच्या दौऱ्यासाठी कालपासूनच पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असताना देखील पिंपरी चिंचवड शहरात मात्र गावगुंडांनी पुन्हा एकदा चार चाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.
PCMC Crime News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या आज पिंपरी चिंचवड शहरातील दौऱ्याच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरात कालपासून चोख पोलीस बंदोबस्त तैनात असताना देखील शहरातील गावगुंडांनी पुन्हा एकदा चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.
स्मार्ट सिटी समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरामध्ये गावगुंडांनी जवळपास दहा-पंधरा चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डन कडे जाणाऱ्या रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांची गावगुंडांनी तोडफोड केलेली आहे.
काल मध्यरात्री बारा ते एक वाजता दरम्यान आलेल्या गावंगुंडांच्या टोळक्याने हातात दगड घेऊन वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या प्रकरणात वाहनांची तोडफोड झालेल्या वाहन मालकांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडा विरोधात सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गाड्या फोडणाऱ्या टोळीवर कारवाई करा : सुप्रिया सुळे
यापूर्वी सुप्रिया सुळेंकडून या गाड्या फोडणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र अजूनही गाड्यांची तोडफोड शहरात सुरुच आहे. 'पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रिय झाली आहे. या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करतात. नागरिकांना धमकावून त्यांना मारहाण करतात. वारजे, पुणे येथेही या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे झाले आहे. पुण्यातील संघटित गुन्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं. मात्र या गॅंगची धिंड काढूनही त्यांचा गुन्हेगारी वृत्ती संपताना दिसत नाही आहे.
पुण्यातही गाड्या फोडणारी टोळी सक्रिय
गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली होती. कर्वेनगर आणि वारजे परिसरात मागील काही दिवसात तीन ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या भागातील वाघमारे आणि त्याच्या टोळीने या वाहनांची तोडफोड केली होती. या टोळीचे तीन हत्ती चौकात आधी विरोधी टोळीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर वाघमारे आणि त्याची टोळी पोरांनी सहकारनगर भागात गेली आणि तिथे या टोळीने आणखी वाहनांची तोडफोड केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :