Katraj Ghat Accident : कात्रज बोगद्यात पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, अचानक ब्रेक झाल्याने अपघात, एक महिला जखमी
Katraj Ghat Accident : मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने तिच्यावर मागून येणाऱ्या चार गाड्या आदळल्या. या अपघातात एक महिला जखमी असल्याची माहिती आहे.
पुणे: कात्रज बोगद्यात अपघात (Katraj Ghat Accident) झाला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पाच गाड्या एकमेकांना धडकल्या. बोगद्यातून जाताना एका गाडी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक महिला जखमी झाल्याची माहिती असून बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका गाडीने अचानक ब्रेक दाबल्यानंतर त्याच्या मागे असणाऱ्या चार गाड्या त्यावर आदळल्या. या अपघाताचा माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या गाड्या बाजूला काढण्याचं काम सुरू केलं..
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांचे आवाहन
ख्रिसमस सुट्ट्यांमुळं पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीतून महामार्ग पोलिसांनी धडा घेतला नसल्याचं दिसून येतंय. आता न्यू इअर सेलिब्रेशनच्या निमित्ताने अवजड वाहतूकदारांना पुन्हा एकदा केवळ आवाहन करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. बेशिस्त अजवड वाहतूकदार महामार्ग पोलिसांच्या आवाहनाला नेहमीच केराची टोपली दाखवतात हे गेल्याचं आठवड्यात सिद्ध झालं होतं. तरी महामार्ग पोलीस केवळ आवाहन करून, पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडीला आमंत्रण देत आहेत. वाहतूक कोंडीबाबत हात झटकणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या या भूमिकेमुळं प्रवाशांमधून नेहमीच नाराजीचा सूर उमटतो.
महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांचेकडून पुन्हा एकदा जाहीर आवाहन
शनिवार दिनांक 30/12/2023, रविवार दिनांक 31/12/2023 अशा सलग सुट्ट्या व नवीन वर्षाची सुरुवात त्यामुळे बरचसे प्रवासी हे पर्यटन स्थळावर जात असतात त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे.
सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते व वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात.
मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता मागील शनिवारी 24 तासामध्ये 55,868 वाहने द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनी वरून गेली तसेच मुंबई पुणे जुना महामार्ग NH 48 या वरून 21,135 वाहने गेली सदर वाहनांना घाटामधील संयुक्तिक मार्गाचा सुद्धा वापर करावा लागतो इतक्या प्रचंड प्रमाणात वाहने आल्यानंतर घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.
तरी सर्व जड अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, वर नमूद दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी 12.00 वा. नंतर सुरू केल्यास त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही तसेच वाहतूक कोंडी मुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिन चे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन व वेळची बचत होईल.
ही बातमी वाचा: