एक्स्प्लोर

Pune Indrayani river bridge collapse: इंद्रायणीच्या कुंडमळा पुलावरुन नदीत पडलेले आणखी किती जण बेपत्ता? महत्त्वाची अपडेट, एनडीआरएफचे जवान पुन्हा नदीत उतरणार

Indrayani river Kundmala River bridge: मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमी होईना, आज पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल रविवारी दुपारी कोसळला होता. चार जणांचा मृत्यू

Pune Rain news: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते. हा पूल कोसळला तेव्हा याठिकाणी तब्बल 100 पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) कालच्या बचावकार्यात 51 जणांना नदीतून बाहेर काढले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या पवना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित लोक किरकोळ जखमी झाले होते. तळेगाव दाभाडे मधील मायमर रुग्णालयात 10 जणांना उपचारासाठी ठेवण्यात आल होत. त्यातले दोघे आयसीयूमध्ये होते. बाकी  रुग्णांना किरकोळ इजा होती त्यांना रात्रीच घरी सोडण्यात आले. तळेगाव दाभाडेतील अथर्व रुग्णालयात 17 जणांना उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र, काल पुलावरुन (Kunjmala bridge) पडलेले आणखी किती जण बेपत्ता आहेत, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यामुळे एनडीआरएफकडून सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बचावकार्याला सुरुवात केली जाणार आहे. ( Indrayani river bridge collapse)

काल रात्रभर मावळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सोमवारचा दिवस उजाडल्यानंतरही मावळमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग आणखी वाढला आहे. त्यामुळे आज याठिकाणी बचावकार्य करताना एनडीआरएफसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. कुंडमळा पुलाजवळ नदीच्या पाण्याचा वेग जोरदार आहे. त्यामुळे आता एनडीआरएफचे जवान नदीपात्रात उतरुन कशाप्रकारे बचावकार्य करणार, हे पाहावे लागेल.

दरम्यान, काल रात्री कुंडमळा पुलाचा नदीत पडलेला लोखंडी सांगाडा नदीपात्रातून दूर करण्यात आला होता. ही दुर्घटना घडली तेव्हा कुंडमळा पुलावर तब्बल 100 जण असल्याचे सांगितले जाते. यापैकी तब्बल 50 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आणखी किती लोक बेपत्ता आहेत, याची नेमकी माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाकडून नदीपात्रात उतरुन बेपत्ता लोकांचा शोध घेतला जाईल.

Kundmala bridge collapse:  आणखी दोन-तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता

इंद्रायणी नदीत पडलेले आणखी किती जण बेपत्ता आहेत, याची माहिती अद्याप प्रशासनाल नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

इंद्रायणी पूल अपघाताच्या बचावकार्यात पावसाचं आव्हान? मध्यरात्रीपासून पावसाचा ठिपका थांबेना, आज पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन

इंद्रायणी पूल कोसळला, चौघांचा मृत्यू; निष्काळजीपणाचे बळी की प्रशासनाचा बेजबाबदारपणा? 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Devendra Fadnavis Prime Minister: माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं वाटतंय; देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या त्या विधानाची जोरदार चर्चा
Poetess Shanta Shelke House Collapsed: कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींचा आधार ढासळला; मुसळधार पावसात मंचरमधील ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget