एक्स्प्लोर

हिंजवडी हत्याकांड : ज्याच्याकडून बंदूक घेतली, त्यानेही गर्लफ्रेडवर गोळ्या झाडल्या, मित्राच्या पावलावर आरोपीचं पाऊल

Pune Hinjewadi Murder Case Update : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये अभियंता महिलेच्या (IT Engineer) हत्याकांडामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत.

Pune Hinjewadi Murder Case Update : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये अभियंता महिलेच्या (IT Engineer) हत्याकांडामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. इंजिनियर तरुणीच्या हत्यप्रकरणातील संशयित आरोपी  ऋषभ राजेश निगम याने ज्या मित्राकडून पिस्तूल घेतले होते. त्यानेही प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर स्वत:वर गोळी झोडून जीवन संपवलं होतं. ऋषभ याने मित्राच्या पावलावर पाऊल टाकत (pune crime News Update) आपल्या प्रेयसीला संपवलं. हिंजवडीतील या घटनेनं रविवारी खळबळ माजवली होती. वंदना द्विवेदी असे हिंजवडीमध्ये खून झालेल्या तरुणीचं नाव आहे.  

लखनौमधील ऋषभ याने रविवारी प्रेयसी वंदना हिच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये तिचा दुर्देवी मृत्यू झाला. पण या घटनेनं पुण्यात खळबळ माजवली. पुण्यातून पळ काढणाऱ्या ऋषभला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ऋषभ निगम ब्रोकर म्हणून लखनौमध्ये काम करतो. त्याला रिअल इस्टेट व्यावसायात दबदबा निर्माण करायचा होता. त्यासाठी त्याने मित्राकडून 2015 मध्ये पिस्तुल घेतले होते.  ऋषभ त्यावेळी वंदना हिच्या घराशेजारी राहत होता. त्यावेली त्याचं आणि वंदनाचं सूत जुळलं.  त्याच्या मित्राचेही एका मुलीसोबत अफेअर होतं.  2018-19 मध्ये त्याच्या मित्राचं आणि प्रेयसीचा वाद झाला. त्यावेळी ऋषभ याच्या मित्राने रागाच्या भरात प्रेयसीला गोळ्या झाडून संपवलं होतं. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली होती. ऋषभ यानेही पुण्यात राहणाऱ्या प्रेयसीवर गोळ्या झाडून खून केला. 

मित्राच्या पावलावर पाऊल 

ऋषभ आणि वंदना यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वंदना कामानिमित्त पुण्यात आली. इंजिनियर वंदना हिंडवाडी आयटीमध्ये कार्यरत होती. दोघांमध्ये लाँग डिस्टन्स रिलेशनशीप होते, त्यामुळे संवाद आपोआपच कमी झाला. त्यातून ऋषभच्या डोक्यात संशायचं भूत आलं. त्यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली. ऋषभनेही मित्राप्रमाणेच शांत डोक्याने प्रेयसीला संपवलं असावे असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतोय. 

कुटुंबाची होणार चौकशी - 

ऋषभ निगम सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीमध्ये ऋषभ याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वंदना आणि ऋषभ यांच्यामध्ये संबंध कसे होते. ते एकमेंकांना कधीपासून ओळखतात. त्यांच्या वादाची माहिती होते का? यासारख्या प्रश्नाची सरबत्ती दोन्ही कुटुंबांवर होणार आहे. पुणे पोलिस ऋषभ आणि वंदना यांच्या कुटुंबियांची चौकशी करणार असल्याचं समोर आले आहे.ट

आणखी वाचा : 

2 दिवसांचा सहवास, खरेदी अन् जेवण, मग 5 गोळ्या झाडून हत्या, IT अभियंता प्रेयसी अन् प्रियकराच्या प्रेम कहाणीचा दी एंड 

OYO मध्ये IT इंजिनियर प्रेयसीवर गोळ्या झाडल्या, 10 वर्षाचं नातं संशयाने संपवलं, उत्तर प्रदेश ते पुणे थरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget