OYO मध्ये IT इंजिनियर प्रेयसीवर गोळ्या झाडल्या, 10 वर्षाचं नातं संशयाने संपवलं, उत्तर प्रदेश ते पुणे थरार
Pune Crime News : प्रेमसंबंधातून प्रियकराने प्रेयसीला OYO हॉटेलमध्ये नेऊन गोळ्या झाडल्या. यामध्ये इंजिनियर तरुणीचा मृत्यू झालाय.
Pune Crime News : प्रेमसंबंधातून प्रियकराने प्रेयसीला OYO हॉटेलमध्ये नेऊन गोळ्या झाडल्याची थरारक घटना रविवारी पुण्यातील हिंजवडी परिसरात घडली. यामध्ये इंजिनियर तरुणीचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी (mumbai police) प्रियकराला ताब्यात घेतलेय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये मागील दहा वर्षांपासून प्रेमसंबंध (Love) होते. दोघेही लखनौचे असून आयटी कंपनीत काम करायचे. मुलगा लखनौमध्ये तर मुलगी पुण्यात होती. दोघांच्या नात्यामध्ये संशयाचे भूत आले अन् प्रेमाचा शेवट झाला. पुण्यात रविवारी घडलेल्या या घटनेमुळे हिंजवड आणि आयटी पार्क परिसरात खळबळ माजली आहे.
वंदना द्विदेदी असे हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. ऋषभ राजेश निगम असे आरोपीचं नाव आहे. दोघेही लखनौचे राहणारे आहेत. वंदना पुण्यात कामाला होती. तर ऋषभ लखनौमध्ये कार्यरत होता. दोघांचं घर लखनौमध्ये एकाच परिसरात आहे. त्यांच्यामध्ये जुनी ओळख आहे.. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेमाचं संबंध होते. पण लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये संशायाने जागा घेतली. 25 जानेवारी रोजी ऋषभ पुण्यात वंदनाला भेटायला आला होता. त्याने लक्ष्मी चौक येथे OYO हॉटेलमध्ये भाड्याने रुम घेतली होती. दोन दिवसांपासून दोघेही तिथेच राहत होते. रविवारी त्यांच्यामध्ये बिनसलं. त्यामध्ये ऋषभ याने वंदानावर पाच गोळ्या झाडल्या. त्यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला.
पाच गोळ्या झाडल्या अन् पसार झाला -
ऋषभ याने वंदना हिच्यावर धडाधड पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो हॉटेलमधून शांतपणे निघून जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. ऋषभ याच्याकडे बंदूक आली कुठून आली? दोघांमध्ये नेमकं काय झालं? याबाबत पोलिस तपास करत आहेत. पण पाच गोळ्या झाडल्यानंतरही हॉटेलमध्ये आवाज का आला नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वंदना हिच्यावर गोळ्या झाडल्यानंतर ऋषभ याने पळ काढला.
मुंबई पोलिसांची धडक कारवाई -
ऋषभ याने गोळ्या झाडल्यानंतर पळ काढला. हत्येबाबात माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांना घटनास्थळावर धाव घेतली. हॉटेल व्यवस्थापकाकडून मास्टर चावी घेऊन खोलीचे कुलूप उघडले. त्यावेळी वंदनाचा मृतदेह मिळाला. इकडे ऋषभ याने तात्काळ पुणे सोडून मुंबईला पळ काढला. पुणे पोलिसांनी तात्काळ मुंबई पोलिसांनी ऋषभ याच्याबद्दल माहिती दिली. मुंबई पोलिसांनी ऋषभ याला ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी खाकी दाखवल्यानंतर ऋषभ याने गुन्हा कबूल केला. हिंजवडी पोलिस मुंबईकडे रवाना झाले असून ऋषभ याला ताब्यात घेणार आहेत.
आणखी वाचा :
Pune Crime news : हिंजवडीत आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ