एक्स्प्लोर
अखेर 23 दिवसांनी पुण्याची कचराकोंडी फुटली!

पुणे : पुण्याची कचराकोंडी अखेर फुटली आहे. फुरसुंगीतील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे तब्बल 23 दिवस पुण्याची कचराकोंडी झाली होती. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर आज फुरसुंगीकरांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.
पुण्यातील कचरा टाकू देणार नाही ही भूमिका घेत फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं होतं. 23 दिवसांपासून आंदोलन सुरु असल्यामुळे पुणे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. दरम्यान काल राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काल फुरसुंगी ग्रामस्थांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला होता. तसंच हा प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन छेडू, प्रसंगी राजीनामे देऊ अशीही भूमिका घेतली होती. मात्र आज स्वत: मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन एक महिन्याचा अवधी मागितला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर फुरसुंगी ग्रामस्थांनी आपलं 23 दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. लवकरच महापालिका आणि राज्य सरकार दीर्घकालीन आराखडा बनवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी काय दिली आश्वासनं?
- एक महिन्याचा अवधी
- एका महिन्यात कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्लॅन बनवणार
- ग्रामस्थांच्या मागण्यांविषयी चर्चा करु
- पुण्यातला कचरा विकेंद्रीत पद्धतीनं कसा जिरवता येईल याचा प्लॅन बनवणार
- नवीन तंत्रज्ञानातून कचऱ्यावर प्रक्रिया करणार
- यासाठी बृहत प्लॅन आखणार
- फुरसुंगीतून जमिनीच्या कॅपिंगचाही विचार करणार
- एका महिन्यात बाबी मांडणार
- नोकऱ्यांची विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी नोकरी देणार
- नुकसानभरपाई कशी देता येईल याचाही विचार
पुणे कचरा प्रश्न न सुटल्यास राजीनामा देऊ : मंत्री विजय शिवतारे
शिवसेनेने पुणे महापालिकेसमोर कचरा फेकला
पुण्यातील कचराकोंडी 20 व्या दिवशीही कायम
19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य
आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट
पुण्याचा ‘कचरा’, सांस्कृतिक राजधानीची ‘कोंडी’
ग्रामस्थांकडून फुरसुंगी कचरा डेपोची अंत्ययात्रा, तर मनसेचंही आंदोलन
पुण्याच्या कचराप्रश्नी आता पंतप्रधान मोदींनी लक्ष द्यावं: सुप्रिया सुळे
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























