Nilesh Ghaywal VIDEO : गुंड निलेश घायवळचा राम शिंदेंसोबत व्हिडीओ व्हायरल, पाया पडला, निवडणुकीचा प्रचारही केला
Nilesh Ghaywal News : निलेश घायवळला लंडनला पळून जाण्यासाठी आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी सावंत यांच्या घरातील व्यक्तीने मदत केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला.

मुंबई : लंडनला फरार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंचा(Ram Shinde) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये गुंड निलेश घायवळ हा राम शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळी निलेश घायवळ हा राम शिंदेंच्या प्रचारामध्ये भाषण करतानाही दिसत आहे. त्यामुळे राम शिंदे आणि राम शिंदेंचे राजकीय संबंध समोर आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
निलेश घायवळच्या शोधात पुणे पोलीस असून तो सध्या लंडनमध्ये फरार झाला आहे. त्याचवेळी राम शिंदे आणि निलेश घायवळ यांचे एकत्रित व्हिडीओ समोर आले आहेत.
निलेश घायवळ राम शिंदेंच्या एका प्रचारामध्ये भाषण करताना दिसत आहे. राम शिंदेंना मतदान करण्याचं आवाहन तो करताना दिसतोय. शिंदे साहेब आपले आहेत, ते कोणत्याही कामामध्ये आपल्यामागे उभे राहतील असं म्हणताना निलेश घायवळ व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
घायवळला पळून जाण्यास आमदारांची मदत
गुंड निलेश घायवळवरून रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यासोबत शिंदे गटाचे आमदारांवर खळबळजनक आरोप केले आहेत. संतोष बांगर, तानाजी सावंतांच्या कुटुंबातील व्यक्तींची घायवळला मदत झाली असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून पळून गेला. त्याला सोडायला कोण गेलं याची आपल्याकडे माहिती आहे. राम शिंदेंनी बाजार समिती निवडणुकीसाठी घायवळचा उपयोग केला. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर राम शिंदे किंवा थेट गृहमंत्र्यांचाच दबाव असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला.
सचिन घायवळ फरार
पुण्यातील गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची घटना ताजी असतानाच त्याचा भाऊ सचिन घायवळचे कारनामेही चर्चेत आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सचिन घायवळचीही भावाप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना गृहरात्र्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना दिलेले आदेश वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
सचिन घायवळनं काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी परवाना देण्यास नकार दिला. याच सचिन घायवळने पुढे शस्त्र परवान्यासाठी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अर्ज केला. योगेश कदम यांनीही या अर्जानुसार सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिलेत. मात्र, या आदेशानंतरही पुणे पोलिसांनी सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता शस्त्र परवाना देण्यास नकार दिला.
ही बातमी वाचा:



















