Pune ganesh visarjan 2023: पुण्यात यंदाही मोठ्या गणपतीचे विसर्जन लांबलं, मिरवणूक लवकर संपण्याचा अंदाज चुकला
दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला. यानिमित्ताने पुण्यातील गणेश मंडळांमधील अंतर्गत चढाओढ चर्चेचा विषय बनली आहे.
पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणूक (pune ganesh visarjan 2023) लवकर पार पडावी यासाठी यावर्षी पुणे पोलीस आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आत विसर्जन देखील झाले मात्र त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच होऊ शकली नाही. कारण दगडूशेठ नंतर या मंडळांएवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. या मोठ्या मंडळांची विसर्जन मिरवणूक दीड वाजल्यानंतर देखील सुरुच झाली नाही. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला. यानिमित्ताने पुण्यातील गणेश मंडळांमधील अंतर्गत चढाओढ चर्चेचा विषय बनलीय.
मिरवणूक लवकर संपेल हाअंदाज चुकला
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन काल बाप्पांनी निरोप घेतला. पाणावलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणांनी आपल्या बाप्पाला निरोप देत आहे. मात्र, पुण्यात एक वेगळीच चर्चा सुरु होती ती म्हणजे यंदा कोणत्या मंडळाचा गणपती विसर्जनासाठी किती वाजता निघणार आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणेही यंदा गणेश विसर्जन दोन दिवस चालणार का? कारण अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजराम यासारख्या मंडळांची मिरवणूक बराच वेळ सुरूच होऊ शकली नाही. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक लवकर संपेल हा अंदाज चुकला.
दगडूशेठ हलवाई गणपतीनंतरची मंडळे रेंगाळली
गेल्या गणेशविसर्जनाच्यावेळी पुण्यातील मिरवणुका ह्या तब्बल तीस तास चालल्या होत्या. दरवर्षी हि मिरवणुकीला लागणार वेळ वाढत वाढत तीस तासांवर गेला. या वर्षी तसे होऊ नये म्हणून गणपती विराजमान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुण्यात विसर्जन मिरवणुकांच्या कार्यक्रमांवर बैठका सुरु झाल्या. पुणे पोलिस आणि गणेश मंडळांच्या चर्चांनंतर उद्याच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये कसं नियोजन असणार? याच्या चर्चा झाल्या. एवढच नाही तर यंदा विसर्जन मिरवणुका वेळेत होण्याचा विश्वास अनेक मंडळांकडून व्यक्त करण्यात आला. कारण, दरवर्षी पुण्यातील पाच मानाचे गणपती विसर्जित होण्यास संध्याकाळ होते. दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन नऊ वाजण्याच्या आत झाले. मात्र पुढची मंडळे रेंगाळली त्यामुळे पुण्यातील गणेश मंडळांमधील अंतर्गत चढाओढ चर्चेचा विषय बनलीय.
हे ही वाचा: