एक्स्प्लोर

Pune Flood : पुण्यात कमरे इतक्या पाण्यात उतरुन काम, शाबासकी ऐवजी निलंबन, संदीप खलाटेंवरील कारवाईने आश्चर्य!

Pune Flood Update : पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कमरे इतक्या पाण्यात उभे राहून प्रयत्न करणाऱ्या संदीप खलाटे यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Pune Flood Update : पुण्यातील बुधवारी उद्भवलेल्या पूर (Pune Flood) परिस्थितीचे खापर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे (Sandeep Khalate) यांच्यावर फोडण्यात आलंय. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी कमरे एवढ्या पाण्यात उभे राहून प्रयत्न करणाऱ्या संदीप खलाटे यांना शाबासकी देण्याऐवजी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्ता (Sinhgad Road) परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) परिसरात जाऊन पाहणी केली होती. यावेळी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यानंतर पूरस्थितीचे खापर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फोडण्यात आले आहे.

पुण्यातील एकतानगरमध्ये शिरले होते पाणी

पुण्यातील खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) अचानक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये (Ekta Nagar) पाणी शिरले. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे हे मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी दिवसभर एकता नगरमध्ये स्वतः पावसांत उभे राहून परिस्थिती हाताळत होतो. अनेकदा पाण्याच्या प्रवाहात उतरुन त्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. 

स्वतः पाण्यात उतरणाऱ्या अधिकाऱ्यावर फोडलं खापर

या पुरस्थितीला नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे, जलसंपदा विभाग आणि महापालिकेचा आपत्ती निवारण कक्षातील संवादाचा अभाव कारणीभूत ठरलेला असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच केलेला असताना त्याचे खापर पूर परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः पाण्यात उतरणाऱ्या अधिकाऱ्यावर फोडण्यात आल्याची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. संदीप खलाटे हे स्वतः त्या दिवशी पाण्यात उतरून मदतकार्य करत असल्याचे दिसून आले होते. सहाय्यक आयुक्तांबरोबरच उपायुक्त संजय शिंदे यांचाही पदभार काढून घेण्यात आला आहे. 

खडकवासला धरणातून 25 हजार 36 क्यूसेकने विसर्ग

दरम्यान, खडकवासला धरण साखळीत  (Khadakwasla Dam) मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात येत आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोमवारी सकाळी 9 वाजता 22 हजार 880 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र दुपारी 12 वाजता विसर्ग वाढवून 25 हजार 36 क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

आणखी वाचा 

Pune Rain : पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे थैमान, खडकवासलातून विसर्ग वाढवला, भिडे पूल पाण्याखाली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Embed widget