एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रंगारींनी पहिला गणपती बसवल्याचं महापौर मुक्ता टिळकांकडून मान्य?
भाऊ रंगारी गणेश मंडळाचे विश्वस्त महापौर मुक्ता टिळक यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळचं कथित संभाषण पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं.
पुणे : पुण्यात पहिल्यांदा गणपती कुणी बसवला, या वादाचा दुसरा भाग आता पुढे येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी आहेत, हे महापौरांनी मान्य केल्याचा दावा रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची कथित ऑडिओ क्लीप समोर आल्यानंतर पुन्हा एकदा लोकमान्य टिळक विरुद्ध भाऊ रंगारी वादाचा नवा अंक सुरु झाला आहे.
भाऊ रंगारी गणेश मंडळाचे विश्वस्त महापौर मुक्ता टिळक यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळचं कथित संभाषण पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं. यंदाच्या पुणे महोत्सवात लोकमान्यांसोबत भाऊ रंगारींचाही फोटो लावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुण्यातल्या वादावर शिवसेनेनंही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात
लोकमान्य टिळकांचं कौतुक केलं आणि रंगारींचा उल्लेख टाळला.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनी केली की भाऊ रंगारींना हा वाद गेल्या तीन वर्षांपासून सुरु झाला. त्यावर अजूनही तोडगा निघाला नाही. पण या वादावर सामान्य पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खरं तर लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी एकमेकांचे मित्र होते. त्यांच्या पश्चात शंभर वर्षानं गणेशोत्सवावरुन असा वाद होईल. याचा स्वप्नातही विचारही दोघांनी केला नसेल. पण त्याच्या अनुयायांनी ही वेळ आणली आहे.
ऐका कथित ऑडिओ क्लीप :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement