एक्स्प्लोर

Bhau Rangari Ganpati : इंग्रजांनाही न कळलेली जागा; पुण्यातील भाऊसाहेब रंगारी वाडा

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ सगळ्यांना माहीत आहे. मात्र हा वाडा आणि याचं महत्त्व लोकांना कळावे यासाठी 2022 मध्ये जीर्णोद्धार करुन हा वाडा लोकांसाठी खुला करण्यात आला. 

पुणे : पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. (Pune Ganeshotsav 2023)याची साक्ष देणारी एक वास्तू म्हणजे भाऊसाहेब रंगारी वाडा. स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांची हक्काची जागा म्हणजे हा वाडा. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ सगळ्यांना माहित आहे. मात्र हा वाडा आणि याचं महत्त्व लोकांना कळावे यासाठी 2022 मध्ये जीर्णोद्धार करुन हा वाडा लोकांसाठी खुला करण्यात आला. 

भाऊसाहेब रंगारी इथे राहत नव्हते पण इंग्रजांशी लढण्यासाठी क्रांतिकारकांना जागा मिळावी यासाठी हा वाडा होता. त्याकाळी इथ गुप्त मार्ग, भुयारी मार्ग होते. शास्त्र लपवायला जागा होती आणि याचा जीर्णोद्धार मागच्या वर्षी करण्यात आला आणि पूर्वी जसा वाडा होता तसाच वाडा पुन्हा एकदा उभारण्यात आला आहे. आपल्या इतिहासाबद्दल पुढच्या पिढीला कळावे यासाठी हा वाडा उभारण्यात आला आहे. 

हा वाडा खरंतर दवाखाना म्हणून ओळखला जायचा कारण भाऊ रंगारी हे राजवैद्य होते. मात्र इथ क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकी व्हायच्या. 1892 साली भाऊसाहेब रंगारी यांनी आणि त्यांच्या तेरा सहकाऱ्यांनी याच भवनात बसून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. वाड्याचं नुतनीकरण करताना वाड्यात कोणतेही नवीन साहित्य वापरले गेले नाही आहे. सगळं होतं तसंच ठेवण्यात आलं आहे, असं भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे यांनी सांगितलं आहे. आपल्या पिढीला या सगळ्याबद्दल कळावं यासाठी जीर्णोद्धार करण्यात आला आणि आपला वारसा, इतिहास संस्कृती कळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचंही ते सांगतात.

भाऊसाहेब रंगारींना रंगारी नाव कसं पडलं?

भाऊसाहेब रंगारी यांचं मूळ नाव भाऊ लक्ष्मण जावळे होते. सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांचं महत्त्वाचं नाव मानलं जातं. भाऊसाहेब हे त्याकाळी राजवैद्य होते. शालूंना रंग देण्याचा त्यांचा पारंपारिक व्यावसाय होता. त्यावरुन त्यांना रंगारी हे उपनाव पडलं. शालुंवरुन त्यांचं दुकान असलेल्या बोळीला शालुकर बोळी असं नाव पडलं होतं. त्याकाळच्या क्रांतीकारी चळवळींमध्ये भाऊसाहेबांचा सक्रिय सहभाग होता. 

संहार करणारी मूर्ती

हा गणपती चार हातांचा आहे. गणपतीने राक्षसाचा एक हात सोंडेत धरलेला आहे. गणपतीने आपला मोडलेला दात आयुध म्हणून हाती धरलेला आहे आणि एका हाताने राक्षसाचे केसदेखील पकडले आहेत, एखाद्या कसलेल्या मल्लाप्रमाणे ही गणेशाची मूर्ती आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहाने इथे गणेशोत्सव साजरा केला जातो आणि अनंत चतुर्थीला थेट बैलगाडीमधून या गणपतीची मिरवणूक काढण्यात येते. 

 इतर महत्वाची बातमी-

'दगडूशेठ'चा निर्णय वैयक्तिक, आमची मिरवणूक 6 नंतरच, पुण्यातील चार मोठ्या मंडळांचा निर्धार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानंच केलं धक्कादायक कांड, शेवटी..
पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानंच केलं धक्कादायक कांड, शेवटी..
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण....
पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण....
Baramati Election Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला! 'विकासाची पंढरी' असलेल्या बारामतीतून रणशिंग; आदिती तटकरे भाषणावेळी भावूक
सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला! 'विकासाची पंढरी' असलेल्या बारामतीतून रणशिंग; आदिती तटकरे भाषणावेळी भावूक
Harshvardhan Sapkal : बारामतीमधून माघार, पण आमचा कुणालाही पाठिंबा नाही; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका, भाजपवर टीका
बारामतीमधून माघार, पण आमचा कुणालाही पाठिंबा नाही; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका, भाजपवर टीका

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
Share Market Today: बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
Virat Kohli Meet Sachin Tendulkar MI vs RCB IPL 2026: मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
Pandharpur Crime News: पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
Asha Bhosle Death: 'आम्ही संघर्ष केलाच नाही का?', इंडस्ट्रीत काम मिळत नाही म्हणून रडणाऱ्यांना आशा भोसले यांनी तिखट शब्दांत सुनावलेलं VIDEO
'आम्ही संघर्ष केलाच नाही का?', इंडस्ट्रीत काम मिळत नाही म्हणून रडणाऱ्यांना आशा भोसले यांनी तिखट शब्दांत सुनावलेलं VIDEO
Monsoon Forecast 2026: मोठी बातमी: यंदा पाऊस किती पडणार? भारतीय हवामान विभाग जाहीर करणार मान्सूनचा अंदाज, महत्त्वाची पत्रकार परिषद
यंदा पाऊस किती पडणार? भारतीय हवामान विभाग जाहीर करणार मान्सूनचा अंदाज, महत्त्वाची पत्रकार परिषद
Eknath Shinde Dharashiv: एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली, 'ते' मेसेज सापडताच पटापट चक्रं फिरली अन्...
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली, 'ते' मेसेज सापडताच पटापट चक्रं फिरली अन्...
Iran US War: होर्मुझची नाकेबंदी करा, डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश धाडले; इराणही सज्ज, जगाला धडकी भरणार, चर्चा फिस्कटल्यानंतर काय काय घडलं?
होर्मुझची नाकेबंदी करा, डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश धाडले; इराणही सज्ज, जगाला धडकी भरणार, चर्चा फिस्कटल्यानंतर काय काय घडलं?
Embed widget