एक्स्प्लोर

Yerwada jail : येरवडा कारागृहातील कैद्याकडे आढळलं चरस; पोलिसांकडून तपास सुरू

पुण्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता येरवडा कारागृहातील कैद्याकडे चक्कं चरस आढळून आलं आहे.

पुणे : पुण्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Yerwada jail) कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता येरवडा कारागृहातील कैद्याकडे चक्कं चरस आढळून आलं आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. कारागृहात कैद असलेल्या शुभम पास्ते याच्याकडे 25 चरस आढळून आलं आहे. शुभमला पोलीस सुनावणीसाठी न्यायालयात नेलं जात होतं. सुनावणी पार पडल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात आणलं गेलं. त्याचवेळी त्याच्याकडे चरस सापडलं. 

मागील काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण पुण्यात चांगलंच गाजत आहे. त्यामुळे कारागृहात कैद्यांवरती खरंच लक्ष दिलं जातं का? त्यांनी त्या ठिकाणी कैद्यांना सुधारणेसाठी ठेवलं जातं का? की कारागृहच मोठ्या गुन्ह्यांचे केंद्र बनलेले आहे? असे प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने विचारले जात आहेत.

शुभम पास्ते हा येरवडा कारागृहात कैद होता. एका गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयात हजर करायचं होतं. त्यानुसार शुभमला येरवडा कारागृहातून पुण्याच्या सत्र न्यायालयात घेऊन आले होते. सत्र न्यायालयात सुनावणीदेखील झाली आणि नंतर त्याला पुन्हा येरवडा कारागृहात घेऊन गेले. परत जाताना त्याची येरवडा कारागृहाच्या प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात आली. त्याच तपासनी दरम्यान त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आलं. हा सगळा प्रकार बंदोबस्तात असताना सुरु होता. सुनावणीसाठी नेत असताना  शुभमकडे चरल आलं कुठून?, त्याला नेमकं हे चरस दिलं कोणी?, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

कारागृहातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह...

मागील काही दिवसांपासून पुण्यातील येरवडा कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कारण ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. त्यासोबतच येरवडा कारागृहातील काही कैदी ससून रुग्णालयात ठाण मांडून होते. या ससून रुग्णालयातून हे कैदी त्यांचे कामं सुरळीत करत असल्याचं समोर आलं होतं. त्यातीलच एक ललित पाटील हा चक्क रुग्णालयातून राज्यात मोठं ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यानंतर ससूनमध्ये असणाऱ्या कैदींना परत कारागृहात पाठवण्यात आलं आहे. 

ललित पाटील ताब्यात...

ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. चेन्नईत मुंबई पोलिसांनी ललितच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली.  ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ललित पाटीलला  शोधण्यासाठी जंग - जंग पछाडत होते. पण कोणतीची माहिती मिळत नव्हती.  मात्र  ललित पाटीलला एक चूक केली आणि तो पोलिसांच्या  जाळ्यात आला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Lalit Patil : नव्या नंबरवरून फोन केला, तिथेच फसला, मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला नेमकं कसं पकडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवारPune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Embed widget