(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalit Patil : नव्या नंबरवरून फोन केला, तिथेच फसला, मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला नेमकं कसं पकडलं?
Lalit Patil Arrested: साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ललित पाटील अलगद जाळ्यात फसला.
मुंबई : ड्रग्ज माफिया (Sasoon Hospital Drug Racket) ललित पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. चेन्नईत मुंबई पोलिसांनी ललितच्या मुसक्या (Lalit Patil Arrested) आवळल्या आहेत. मुंबई साकीनाका पोलिसांनी (Mumbai Sakinaka Police) ही कारवाई केली. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ललित पाटीलला शोधण्यासाठी जंग - जंग पछाडत होते. पण कोणतीची माहिती मिळत नव्हती. मात्र ललित पाटीलला एक चूक केली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात आला
पुणे पोलिस ललितच्या मागावर असताना साकीनाका पोलिस ललित पाटीलसाठी सापळा रचत होते. साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ललित पाटील अलगद जाळ्यात फसला. साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंकर साकीनाका पोलीसांनी प्रचंड गोपनीयता बाळगत तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे.त्यावरून पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती.
कसा केला पुणे ते चेन्नई प्रवास?
एकीकडे फरार ललित पाटीलवरून राज्यात वातावरण तापले होते. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी एका बडा नेत्याचा हात असल्याचे आरोप होत होते. सत्ताधारी आणि विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू होते. या दरम्यान ललित पाटील मात्र एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने ललित आणि आणि त्याचे दोन सहकाऱ्यांसह आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरूला पोहचला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत त्याला मुंबईत आणण्याची शक्यता आहे.
साकीनाका पोलिसांनी केलेल्या कारावाईचे कौतुक
स्थानिक पातळीवर पोलीस आणि डॉक्टरांचे घट्ट जाळं ललित पाटीलने स्वतःच्या बचावासाठी विणलं होतं. तसच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा तो भाग होता. त्यातूनच मलेशिया आणि थायलंड सारख्या देशांमध्ये त्यानं मेफेड्रोन पाठवल्याच समोर आले होते. हे ड्रग सिंडिकेट तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतच आहे शिवाय तो कधी सापडूच नये असे वाटत होते. ललित पाटीलला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न होत असताना साकीनाका पोलिसांनी केलेल्या कारावाईचे कौतुक होत आहे
हे ही वाचा :