Pune Crime News: विसापुरजवळ 5 वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन; गुन्हा दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
Pune Crime News: दोन महिन्यांपूर्वी तो एसआरपीएफ मधून पुणे ग्रामीण पोलीस दलात रुजू झाला आहे, यापूर्वी त्याने असे काही प्रकार केलेत का? याचा ही तपास सुरु आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे. सचिन सस्ते असं त्या पोलिस कर्मचाऱ्यांचं नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याच्यावर पॉक्सोसह ॲट्रॉसिटीनुसार (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी तो एसआरपीएफ मधून पुणे ग्रामीण पोलीस दलात रुजू झाला आहे, यापूर्वी त्याने असे काही प्रकार केलेत का? याचा ही तपास सुरु आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
या पोलिसाला आपण एका दिवसाकरता बंदोबस्तासाठी पाठवलं होतं, काल 25 डिसेंबर होता. नाताळची सुट्टी असल्यामुळे जादाचा बंदोबस्त ठेवण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं, त्यांना विसापूरच्या पायथ्याखाली बंदोबस्त दिला होता. त्या ठिकाणी गर्दी होते. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अशी तक्रार आल्यानंतर आम्ही तिथे गेलो. त्या पोलिसाला ताब्यात घेतलं. त्याची मेडिकल तपासणी झाली. फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेतील पीडित मुलगी आहे, तिला देखील याबाबत प्रश्न विचारण्यात आले. तिने देखील याबाबतची सविस्तर दिली आहे. त्यानंतर या प्रकरणात आपण गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये योग्य ती कलम लावण्यात आलेली आहेत. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस कर्मचारी आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्याची चाचणी करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांनी याआधी असे काही प्रकार केले आहेत का, अशा काही घटना घडलेल्या आहेत का याची तपासणी सुरू आहे.
ही घटना घडली त्यावेळी त्यांनी मद्य प्राशन केलेलं होतं, त्याची तपासणी करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी आपण काहींना बाहेरून बोलवतो. त्यामधील ते एक होते. लोणावळा मुख्यालयातून तो पोलीस कर्मचारी आलेला होता. या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं आहे, त्यासंबंधीची प्रोसेस सुरू आहे. जशा बाबी समोर येतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. या घटना घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू करत आहोत, अशी माहिती लोणावळ्याचे डीवायएसपी राजेंद्र माने यांनी दिली आहे
नेमकं काय आहे प्रकरण?
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले आहेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार काल (बुधवारी) नाताळ दिवशीचं घडला.
नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते, म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून त्याने भाकरी घेतली आणि जेवण केलं. त्या भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिलं. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि या नराधम पोलिस रस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
चिमुकल्या मुलीच्या आजीने सांगितली हकीकत
आम्ही विसापूरच्या पायथ्याशी राहतो. आमचं तिथं घर आहे. आमचा छोटी मुलगी तिथं वाळूच्या ढिगाऱ्यावरती खेळत होती. मी त्या पोलिसाला जेवायला दिलं, त्यानंतर मी शेतावर गेले, मुलगी तिकडे खेळत होती, आणि माझी सून आणि भाची घरामध्ये स्वयंपाक बनवत होत्या. माझी सून जेव्हा काऊंटरजवळ आली तेव्हा त्या लहान मुलीने आपल्या आईकडे येऊन सांगितलं, त्या पोलिस काकांनी मला मागं नेलं आणि माझ्या अंतर्वस्त्रांमध्ये हात घातला. ती रडत होती, आणि घाबरली होती. सुनेने आणि माझ्या मुलाने मला फोन केला. मी घरी आले. तेव्हा माझ्या मुलाने मला सर्व घटना सांगितली. त्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावलं. त्यांनी विचारलं काय झालं, तेव्हा त्यांना सर्व माहिती दिली, जर कायद्याचे रक्षक असं वागतं असतील तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असं त्या चिमुकल्या मुलीच्या आजीने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
खाकी घातलेल्या त्याने पोलिसांनी दारू पिलेली होती. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कायद्याचं रक्षण करणारे लोक जर असे गरिबाची छेड काढायला लागले तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल देखील त्या चिमुरड्या मुलीच्या आजीने उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
