Pune Crime News : पुण्यात मध्यरात्री भरचौकात गुंडाचा खून, पाठलाग करून टोळक्यानं दगडाने ठेचलं
Pune Crime News : रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री हा खून (Pune Crime News) करण्यात आला आहे. राजू शिवशरण असं या कुख्यात गुंडाचं नाव आहे.
Pune Crime News: पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढतानाचे चित्र दिसून येत आहे. पुणे पुण्यात कुख्यात शरद मोहोळनंतर आता पुन्हा एका कुख्यात गुंडाचा खून (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री हा खून (Pune Crime News) करण्यात आला आहे. राजू शिवशरण असं या कुख्यात गुंडाचं नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसात घटनेची नोंद झाली असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
गुंड राजू शिवशरण याची मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून (Pune Crime News) करण्यात आल्याने पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड आहे. राजू शिवशरण खून प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रामटेकडीतील राजू शिवशरण्याचा पाठलाग करून खून त्याचा खून (Pune Crime News) केल्याची माहिती आहे.
या खून प्रकरणी राजू शिवशरणचा भाचा निखिल कैलास चव्हाण, (रा. वंदे मातरम चौक गणपती मंदिर मागे, रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर महेश शिंदे ,नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड, (रा सर्व रामटेकडी व इतर दोघेजण अनोळखी इसम) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील रामटेकडी येथे वंदे मातरम चौकात मध्यरात्री दीडच्या सुमारास हि घटना घडली. महेश शिंदे ,नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड, आणि दोन इसमांनी पैसे न दिल्याच्या कारणावरून राजू शिवचरणला वीट, दगड , सिमेंटचे तुकडे, तसेच लाथा बुक्क्याने मारून गंभीर जखमी केलं. त्यावेळी राजू शिवशरणचा भाचा निखिल चव्हाण याने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेश शिंदेने त्याच्याही डोक्यात बाटली मारून त्याला जखमी केले आणि तो पळून गेला. असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस घटनेचा( Pune Police) तपास करत आहेत.