पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात
विदेशातून ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे .
पुणे : पुण्यात (Pune Crime News) उच्चभ्रू परिसरात सध्या सेक्स रॅकेट (Sex Racket) मोठ्या प्रमाणत सुरु असल्याचं समोर येत आहे. पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल्सना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यातील विमाननगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.विदेशातून हा वेश्या व्यवसाय सुरू चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरू केला होता. राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उजबेकिस्थानी मॉडेलला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उजबेकिस्थानमधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करत होत्या. विदेशातून ऑनलाईन पद्धतीने वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे .
विदेशातून चालवण्यात येत होता वेश्या व्यवसाय
वेश्या व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवणाऱ्या आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विमान नगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित तरुणींची सुटका केली होती.
पुण्यातील अवैध ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर...
सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, अवैध व्यावसाय काही बंद होण्याचं नाव घेत नसल्याचं शहरात घडत असलेल्या घटनांवरुन दिसत आहे.
नागरिकांना थेट तक्रारी कराव्यात, पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. अनेक हायप्रोफाइल प्रकरणे उघडकीस आणली होती. मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
मांडव सजला, वऱ्हाडी आले, लग्न लागण्यापूर्वीच पोलिसांची एन्ट्री; नवरा पसार, नववधू पोलिसांच्या ताब्यात, नेमकं घडलं काय?