Pune Crime News: पुण्यातही तोच चीड आणणारा प्रकार, स्वातंत्र्यदिनी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, भवानी पेठेतील घटना
Pune Crime News: पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Pune Crime News: बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटत असतानाच दुसरीकडे पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे, पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा (Pune Crime News) प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा घटना सातत्याने समोर येत असल्यामुळे पालक आपल्या चिमुरड्या मुलांना शाळेत पाठवताना कोणाच्या विश्वासावर पाठवायचं असा संतप्त सवाल करत आहेत.
पुण्यातील हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील १९ वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भवानी पेठेत नामांकित शाळा आहे. या शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी तरुण हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता. पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने तिचा हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात (Pune Crime News) ओढत घेऊन गेला. यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य (Pune Crime News) केले. मात्र पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत पळ काढला. घरी गेल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून १९ वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया
पुण्यातील ही घटना मला आत्ता समजली आहे, संबंधित आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. बदलापूर मधील घटना देखील संतापजनक आहे, महिला आयोगाने या गोष्टीची दखल घेतली आहे. गुन्हा दाखल करायला उशीर लावल्याने त्या पोलिसांना निलंबित केलं गेलं आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्यासाठी गृहमंत्री यांनी सूचना दिल्या आहेत. बदलापूर प्रकरणात एस आय टी स्थापन केलेली आहे. पालकांनी सुद्धा जागरूक राहणे गरजेचे आहे.
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार
बदलापूर पूर्वमध्ये एका नामांकित शाळेत शिकत असलेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट दिसून येत आहे. संबंधित शाळेतील एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं आहे. संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास दिरंगाई केल्याचा आरोप केला जात आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा दावा केला जात आहे.
या संतापजनक घटनेनंतर आज बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली. तसेच या प्रकरणातील आरोपी नराधमावर तात्काळ कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये शाळेतील पालकांसह नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे स्थानकावर ठिय्या देत रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे. तर काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.