Nilesh Ghaiwal : परेड काढली, दम दिला तरीही अरेरावी संपेना; गुंड निलेश घायवळला पोलिसांचा पुन्हा दणका, पुण्यातील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
कुख्यात गुंडांची परेड काढून त्यांना दम दिल्यानंतरही कुख्यात गुंडांची अरेरावी संपायचं नाव घेत नाही आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ याने पोलिसांवरच अरेरावी केल्याचं समोर आलं आहे.
![Nilesh Ghaiwal : परेड काढली, दम दिला तरीही अरेरावी संपेना; गुंड निलेश घायवळला पोलिसांचा पुन्हा दणका, पुण्यातील रस्त्यावर नेमकं काय घडलं? Pune crime news Pune Police has taken action against the vehicle of Nilesh Ghaywal a goon with black film in yerwada Nilesh Ghaiwal : परेड काढली, दम दिला तरीही अरेरावी संपेना; गुंड निलेश घायवळला पोलिसांचा पुन्हा दणका, पुण्यातील रस्त्यावर नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/09/a465568981650a31c6a51135140eed1b1712642554281442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : कख्यात गुंडांची परेड काढून (Pune Crime news) त्यांना दम दिल्यानंतरही कुख्यात गुंडांची अरेरावी संपायचं नाव घेत नाही आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याने पोलिसांवरच अरेरावी केल्याचं समोर आलं आहे. निलेश घायवळच्या गाड्यांच्या नंबर्स पाहून पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला असता त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला आहे.
निलेश घायवळ याला पुणे पोलिसांनी पुन्हा दणका दिला आहे. पुणे नगर रस्त्यावरून निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदाराचा ताफा जात असताना खराडी परिसरात वाहतूक पोलिसांनी त्याचा ताफा अडवला. सुरुवातीला त्याने पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ही त्याला पोलिसी खाक्यादाखवला आणि दंड वसूल केला. गाडीवर काळ्या काचा लावल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल सहा हजार रुपयाचा दंड बसून केला. त्यासोबतच त्याच्या सगळ्या गाड्यांच्या नंबर प्लेटवरुन ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या फिल्म लावण्यास मनाई आहे. त्यात घायवळच्या गाड्यांवर Boss असं लिहिलं आहे. याच नंबर प्लेटवर कारवाई करत 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोण आहे निलेश घायवळ?
निलेश घायवळ हा गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची दहशत होती. मात्र गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गॅंगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीने दिलं. अखेर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली.कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.
काळ्या फिल्मवर धडाधड कारवाई
पुण्यात सध्या हौशी कारचालक आणि काळ्या फिल्म लावणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून अनेक रस्त्यांवर बंदोबस्त करण्यात आला आहे. अनेक अशा फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या फिल्म असलेल्या गाड्यावर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक पुणेकरांवर कारवाई करण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी-
Prakash Ambedkar : ठाकरे आणि शरद पवारांनी स्वतःमध्ये बदल करावेत, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)