Ramdas Kadam on Sanjay Raut : मातोश्रीवर आम्ही किती मिठाईचे बाॅक्स पोहचवले हे माहित नाही का ?
संजय राऊत येड गावला जाऊन पेढं कशाला खात आहात, मातोश्रीवर आम्ही किती मिठाईचे बाॅक्स पोहचवले हे माहित नाही का ? एका मराठी माणसाला दुसरा मराठी माणूस कसा मागे खेचतो हे निलमताईला सांगायचं होतं.... संजय राऊत यांना बोलायची पद्धत राहिली नाही. आपण कोणाला एका उपसभापतींना काय बोलतोय याचं भान नाही. मुघलांंना ज्या प्रकारे संताजी धनाजी ठिक ठिकाणी दिसायचे तसे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना एकनाथ शिंदे दिसतात.... एकनाथ शिंदेंनी त्यांच्या राजकारणाला सुरुंग लावल्यने ही जळफळाट आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली.
रामदास कदम, शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठनेते
- नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आहेत
- नीलम गोऱ्हेंना जे सांगायचं ते त्यांनी सांगितलं, की मराठी माणूसच कसा मराठीचा अपमान करतो
- शाखाप्रमुखांच्या नियुक्त्यांसाठी काय मिठाया द्याव्या लागतात हे आम्हाला माहिती आहे
- नीलमताईंनी अनेक कविता लिहिल्या आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे काय बोलयाच
- शरद पवारांना संजय राऊत बाप म्हणतात तुम्ही त्यांच्यावरही टीका करता
- संजय राऊतांना भान असलं पाहिजे की ते महिलेबद्दल काय बोलतात
- उद्धव ठाकरेंसोबत राहुन त्यांची पातळी किती खालवली आहेत हेच संजय राऊत दाखवतात
- मुघलांचे घोडे जेव्हा पाणी प्यायचे तेव्हा त्यांना पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे तसे उबाठाच्या लोकांना सगळीकडे शिंदेच दिसतात
महत्त्वाच्या बातम्या


















