Pune Crime News : सराफा दुकानात शिरले, दुकानदाराची नजर चुकवली, मिनिटांत 25 लाखांचं सोनं केलं लंपास
पुण्यात एका सराफ्याच्या दुकानात दुकानदाराची नजर चोरून जबरी चोरी करण्यात आली आहे. येरवडा भागात असलेल्या सराफा दुकानात 6 जणांनी चोरी केली आहे.
पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून (Pune Crime News) चोरीच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यात पुण्यात एका सराफ्याच्या दुकानात दुकानदाराची नजर चोरून जबरी चोरी करण्यात आली आहे. येरवडा भागात असलेल्या सराफा दुकानात 6 जणांनी चोरी केली आहे महत्वाचं म्हणजे दुकानदाराचे लक्ष विचलित करून चोरी केली आहे.
महावीर ज्वेलर्स असे येरवडा भागात असलेल्या सराफ दुकानाचे नाव आहे. या दुकानातून चोरट्यांनी लंपास 372 ग्रॅमचे दागिने लंपास केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश जैन हे महावीर ज्वेलर्सचे मालक आहेत. फिर्यादी हे सकाळी अकराच्या सुमारास एकटे असताना सहा चोर सोनं खरेदीच्या बाहण्याने महावीर ज्वेलर्समध्ये आले होते. यातील एकाने मुलीसाठी अंगठी पाहिजे असल्याचं सांगितलं. त्यानंतर फिर्यादी जैन यांनी अंगठी दाखवली असता त्याने ती बघून परत केली. त्यानंतर टोळक्यातील दुसऱ्याने चांदीची मूर्ती पाहिजे असल्याचे फिर्यादी जैन यांना सांगितले. त्यामुळे जैन काऊंटरवरुन उठून बाजूला असलेल्या शोकेस मधील मूर्ती दाखवायला गेले. चोरट्यांनी मूर्ती पाहिल्या मात्र ते काही घेतल्या नाही. दरम्यान, फिर्यादी जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवत इतर चोरट्यांनी काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पॅकेट मधील सोन्याची चैन, मंगळसूत्र, सोन्याच्या 9 अंगठ्या असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
पुण्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यात घरावर दरोडा, रस्त्यांवरील गाड्या चोरण्याची प्रकरणं जास्त आहे. त्यात सराफा दुकानातदेखील भरदिवसा चोरी झाल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. यातच आता सोन्याच्या दुकानात नजर चुकवून चोरी करायची घटना समोर आल्याने दुकानदारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Koyta Gang : पुण्यात कोयते हल्ले सुरुच; सलग दोन दिवस भररस्त्यात कोयते घेऊन राडे
उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर दुसरी सभा