Pune Crime News : वाहतूक कोंडी अन् गाडी लावण्यावरुन वाद; रिक्षा चालक निवृत्त पोलिसाच्या हाताला चावला अन् थेट अंगठाच तोडला!
पुण्यातील एका रिक्षावाल्याचं आणि दुचाकीस्वार असलेल्या निवृत्त पोलिसांचं भांडण झाल्याने रिक्षावाला निवृत्त पोलिसांच्या हाताला चावल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : पुणे : पुण्यात सध्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न (pune Crime news) निर्माण झाला आहे. याच वाहतूक कोंडीमुळे अनेकदा भर रस्त्यात भांडणं झाल्याच्य आणि मारहाणीच्या घटना आपण पाहिल्या आहेत. त्यातच पुण्यातील एका रिक्षावाल्याचं आणि दुचाकीस्वार असलेल्या निवृत्त पोलिसांचं भांडण झाल्याने रिक्षावाला निवृत्त पोलिसांच्या हाताला चावल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे निवृत्त पोलिसाच्या हाताचा अंगठाच तोडला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
66 वर्षीय ज्ञानेश्वर खंडु बेंद्रे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रिक्षा चालक असलेल्या गणेश सोमनाथ भुसावळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार पेठेत ही घटना घडली आहे. रविवार पेठेत रोज मोठी गर्दी असते. किरकोळ आणि होलसेल अशी मोटी बाजारपेठ आहे. पुण्यातील अनेक परिसरातील लोक या बाजारपेठेत खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी होते. परिणामी पार्किंग पुरत नाही. या पार्किंगवरुन अनेकदा वाद होतात आणि या वादाचं रुपांतर मारहाणीत झाल्याचं पाहिलं आहे.
पुण्यातील रविवार पेठेत निवृत्त पोलीस असलेले ज्ञानेश्वर बेंद्रे हे आपल्या पत्नी सोबत गेले होते. त्यांनी घरगुती सामान खरेदी करण्यासाठी ते आले होते. त्यांनी त्यांची गाडी राजहंस मेटल्स समोर पार्क केली होती. ही दुचाकी काढत असताना रिक्षा चालक आणि त्यांच्याच वाद झाला. रिक्षाचालकाने निवृत्त पोलिसाला शिवीगाळ केली. पुण्यात येतात आणि गाड्या आडव्या घालतात’, अशा शब्दांत जोरदार ओरडला आणि त्याने थेट निवृत्त पोलिसांचं शर्ट फाडलं आणि धक्काबुक्की करुन उजव्या हाताच्या अंगठ्याचा जोरदार चावा घेतला. यात अंगठ्याचा समोरचा भागच तुटला.
वाहतुक कोंडीमुळे पुणेकर संतापले!
मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडीचा आणि पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा संताप झाल्याचं आणि त्यांची चिडचिड झाल्याचं अनेकदा पाहिलं आहे. त्यामुळे मारहाण आणि भांडणं झाल्याच्या घटनादेखील समोर येतात. या घटना थांबवायच्या असतील तर पुण्यात वाहतूक कोंडींवर उपाययोजना करण्याची गरज आहे.
इतर महत्वाची बातमी-
पुण्यात भरधाव सुपरकारने पार्टी करुन परत येणाऱ्या दोघांना चिरडलं; मध्यरात्रीच्या घटनेनं थरकाप